पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ अद्भुत रसाने भरलेल्या नाटकांतील मुख्य पात्रांचे फोटो आम्ही आमचे वाच- कांस आज सादर करीत आहों. मिसेस आनि बिझांट. मिसेस् आनि बिझांट म्हणजे कांहीं लहानसहान प्रस्थ नाहीं. आकर्षक चेहेरा, वक्तृत्वपूर्ण वाणी, उद्योगपूर्ण आयुष्यक्रम, विलक्षण बुद्धिमत्ता व असाधा- रण कर्तबगारी अंगीं असलेल्या या बाईनें युरोप व अमेरिका खंडांतील लोकांनाही हालत्रून सोडलें. नास्तिक व ' सोशियॉलिस्ट म्हणून सुधारलेल्या राष्ट्रांतही गाज- लेल्या या स्त्रीनें एकदम धर्मनिष्ठ वनून भगवीं वस्त्रे घेतली व हातांत रुद्राक्षमाला धारण करून धार्मिक तत्त्वज्ञान सांगण्यास प्रारंभ केला तेव्हां जग थक्क झालें; व ती हिंदुस्थानांत येऊन हिंदुधर्माची महती गाऊं लागली तेव्हां कित्येक हिंदी सुशि- क्षित ' योगिनी ' ' योगिनी' म्हणून तिच्या चरणी लीन झाले. बाईंच्या आग- मनाचीं व गमनाची वर्णनें, त्रोटक व सविस्तर चरित्रे, व्याख्यानें व संवाद, चित्रे व उपदेश हिंदुस्थानांत प्रसिद्ध होऊन प्रसार पावले; आनि विझांटबाई म्हणजे शंकराचार्च किंवा पोप यांच्यासारखी एक धार्मिक बाबतींत विशेष अधिकारी अशी स्त्री मानण्यांत येऊं लागली. ही बाई आमच्या देशांत जन्म पावलेली नाहीं, ही बई आमच्या जातींतली नाहीं किंवा आमच्या समाजांतील नाहीं, तरी पण आमच्या समाजांतील सुशिक्षित वर्गाच्या मनावर या बाईचा इतका पगडा बसलेला आहे की, तिच्या उपदेशांकडे व हालचालींकडे दुर्लक्ष करणें बिल- कुल योग्य होणार नाहीं. धर्माच्या साम्राज्यांत राज्ञीपदावर आरूढ होऊन श्रद्धाळू शिष्यवृंदाला स्वेच्छेप्रमाणे नाचविण्यास ह्या बाईनें प्रारंभ केला आहे; एवढेच नव्हे तर नव्या अवताराच्या गोष्टी सांगून भोळ्या लोकांना झुलविण्यासही आतां सुरुवात झाली असून आपल्या दुराग्रहाने आपल्या 'सोयायटी'च्या अब्रूसही कमीपणा येऊं देण्यास ही बाई तयार झाली आहे. धर्माच्या उच्च वातावरणांतून राजकारणाच्या त्या मानानें दूषित वातावरणांत शिरण्यास वाईला दिक्कत वाटलेली नाहीं; आणि राजकारणांतील लांडावीचें अवलंबन करून बाईनी आपल्या प्रति- पक्षीयांच्या अंगावर घाण उडविण्यासही कमी केलेले नाहीं. अशा या बाईची पूर्वीची थोडीशी हकीगत सांगावयाची म्हणजे, १८८९ साली ' थिऑसॉफिकल