पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ " योग्य ठरविण्यास पुढे आलेल्या ' थिऑसॉफी ' ला बिलगावें असें कित्येक हिंदी सुशिक्षितांस साहजिकच वाटले. 'तुम्ही कोणत्याही धर्मोतले असा किंवा कोणत्याही धर्मातले नसा, तुम्ही श्रद्धाळू असा की शंकेखोर असा, धर्म संबंधांचे ग्रंथ व त्यांतील तत्त्वें यांच्या अध्ययनाची जिज्ञासा तुमच्यांत असली म्हणजे झालें; सत्य हाच आमचा धर्म व हें सत्य सर्व धर्मात आहे अशा बुद्धीने त्याचा सर्वत्र शोध करणें हेच आमचें कर्तव्य असे आम्ही समजतों, तेव्हां एवढे तुम्हांस मान्य असले म्हणजे झाले, ' अशा अर्थाची उदार विचारसरणी ऐकून अस्वस्थ मनाच्या सुशिक्षितांना या पंथांत जाणें साहजिकच इष्ट वाटले. पण, मूळधर्म चांगला असला तरी त्याचें प्रवर्तन करणारांतील दोषामुळे जसें त्याचें स्वरूप पुढे दूषित होतें ही गोष्ट ' थिऑसॉफिस्टां' नाही मान्य आहे- त्याचप्रमाणे ' थिऑसॉफी ' पंथाचीं तच्चें मूळ जरी चांगली व उद्देश जरी पटण्यासारखा असला तरी तिचें स्वरूप तिच्या प्रवर्तकांनी पुढे दूषित केलें, आणि हळू हळू कोणत्याही धर्मपंथांत दिसून येणारे दोष या पंथांतही दिसून येऊं लागले. आणि यांत नवलही नाहीं. कारण धर्म झाला तरी तो मानवच सांगणार व धर्मपंथ झाला तरी तो मानवच चालविणार; आणि मानवांत दोष हे असावया- चेच; तेव्हां मानवांनी चालविलेल्या ' थिऑसॉफी' च्याही पंथांत दोष राहिले व वाढले तर त्यांत अस्वाभाविक असें कांहींच झालें नाहीं. पण, सत्य व ज्ञान यांचा शोध लावूं इच्छिणारानें अनुभव, तर्क व धर्मग्रंथ या तीनहीं सहाय्यांनीं तो शोध करावा, असे मानणाऱ्या लोकांस सुधारलेल्या व सुशिक्षित ' थिऑसॉ फिस्टां' च्या अंध श्रद्धेबद्दल वाईट वाटल्यास तेंही असाहजिक नाहीं. आंधळ्या श्रद्धेच्या नादी लागलेले लोक अविवेकाच्या उतरणीवरून घसरूं लागले म्हणजे कसे घसरूं लागतात; आणि बुद्धिवान्, धूर्त, कर्तबगार व महत्त्वाकांक्षी धार्मिक पुढाऱ्यांच्या चरणी लागणारा शिष्यवृंद कधी कधी कसा बेहोष होतो, हें ज्यास पहावयाचे असेल त्यानें मिसेस आनि विझांट यांजवर मद्रास हायकोर्टात जो खटला चालला व ज्या खटल्यांत जस्टिस बेकवेल्ल यांनों मिसेस आनि बिझांट यांचे विरुद्ध निकाल दिला त्या खटल्याची व त्यामुळे बाहेर आलेल्या कित्येक गोष्टींची माहिती अवश्य करून घ्यावी. या संबंधीची साद्यंत हकीकत किंवा माहिती देणे आम्हांस शक्य नाहीं; तरी या प्रकरणाची त्रोटक हकीकत व या