पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिसेस् बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण. · थिऑसॉफी ' तील अवतारप्रवर्तन. जगांतील निरनिराळे धर्म हे अज्ञानापासून उत्पन्न झालेले नसून ज्ञानापासून जन्म पावलेले आहेत, सर्व धर्मोच्या मूळ प्रवर्तकांनी स्थापिलेल्या व प्रतिपादि- लेल्या तत्त्वांत साम्यच नव्हे तर ऐक्यही आहे आणि वरवरचे मतभेद व स्थल- कालादि भेदामुळे झालेले फरक बाजूला सारून सर्व धर्मोतील ज्ञान-भाग सर्वोनों ग्रहण करणे इष्ट होय, असे प्रतिपादन करणाऱ्या ' थिऑसॉफिकल सोसायटी वें एक मुख्य ठाणे अड्यार ( मद्रास ) येथें व दुसरें मुख्य ठाणे बनारस काशी क्षेत्र ) येथे आहे हें सर्वविश्रुतच आहे. या दोन ठिकाणांहून थिऑसॉफी' चें प्रवर्तन सबंध हिंदुस्थानांत व हिंदुस्थानाबाहेरही आज कित्येक षे चालू आहे; आणि पर. मॅडम् ब्लॅव्हॅटसकी, पर. कर्नल आल्कॉट व मिसेस् निविझांट यांच्या भाषणांनीं, लेखांनी, व इतर खटपटींनीं ' थिऑसॉफी , पंथाची बरीच चलतीही झाली आहे. इंग्रजी भाषेच्या व तद्वारा नवनव्या ..स्त्रीय शोधांच्या व तत्वांच्या ज्ञानांनी ज्यांची आपल्या धर्मावरील श्रद्धा उडून की होती व आनुवंशिक संस्कारानें कोणत्या तरी धर्मपर पंथांत जाण्याची पांच्यांतील प्रवृत्ति मात्र कायम होती अशा इंग्रजी शिकलेल्या अर्धवट नास्तिक हैदी लोकांना इंग्रजी भाषेत, इंग्रजी थाटांत, इंग्रजी किंवा युरोपियन माणसांनी प्रतिपादिलेली ' थिऑसॉफी फार पटली, निदान रुचली किंवा आवडली, तर यांत कांही नवल नाहीं. धडधडीत नास्तिक म्हणवावें तर आनुवंशिक संस्कार तक्रार करूं लागले व पूर्वीप्रमाणें धर्मावर श्रद्धा ठेवून धर्मनिष्ठ रहावें तर इंग्रजी शिक्षणानें तें शक्य राहिलें नाहीं, तेव्हां धर्माची मूलतत्त्वें अर्वाचीन तर्कशास्त्रानें