पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करण्याचा प्रयत्न झाला. चुंबकत्व आणिलेले ( मॅग्नेटाइज्ड ) ? तारे व फिती छातीवर लटकवून त्याचे आजोबा किंवा आजीबाई शोभणाऱ्या माणसांनी त्याची पूजा करण्यास व त्याचे देव्हारे माजविण्यास सुरुवात केली; तेव्हां याच्या बुडाशी अज्ञान किंवा पाजीपणा याखेरीज कांहीं असण्याचा संभव नाहीं - निव्वळ अज्ञान असले तरी तें उपेक्षणीय नाहीं असें लोकांच्या लक्षांत आलें; आणि बुद्धि व वाणीच्या जादूनें कित्येक वर्षे भारली गेलेलों कित्येक माणसे जागी झाली व डोळे चोळून आजूबाजूस पाहूं लागली. आपल्या शरीरापेक्षा आपलों मनें विकर्णे किंवा मूर्खपणानें तो दुसन्याच्या सर्वस्वी हवाली करणें अंतों कसें हानिकारक ठरतें, हें ध्यानांत आल्यामुळे कित्येक जुन्यापुराण्या ' थिऑसॉफिस्टां'नीं विझांट- बाईचा उघड निषेध केला; आणि कित्येकांनी तर 'सोसायटी' सही राम राम ठोकला. 'सोसायटी 'च्या सभासदांची संख्या आतां कांहीं हजारांनी कमी झालेली आहे म्हणतात. विझोटबाईकरितां कॉलेज सोडणाऱ्या प्रोफेसरांची ' थिऑसफी' किंवा 'लोकशिक्षण' यांसंबंधीची चाड व्यक्तिनिष्ठेपेक्षां कनिष्ठ आहे असे सिद्ध झालें, आणि धार्मिक व अवतारी म्हणविणारी माणसें राजकीय वातावरणाचा फायदा घेऊन प्रतिपक्षीयांवर धडधडीत खोटे आरोप करण्यास कश मागेपुढे पहात नाहींत याचा मासला जगा पुढे आला. धर्मप्रवर्तन करावयास निघालेले लोक सर्वसाधारण माणसांप्रमाणेच डावपेंच कसे लढवितात, व्यवहार करितांना सौजन्य किंवा सत्य यांपेक्षां उपयुक्तते- कडेच त्यांची दृष्टि कशी असूं शकते, त्याचप्रमाणे तोंडानें उच्च तत्त्वांचा बोध करणाऱ्या धार्मिक विभूति सारासार विचारावर निखारा ठेवून, अहंकारानें सर्व गोष्टी वेळी कशा करूं लागतात याचा दाखला या विझांट-प्रकरणानें सर्वोस उप- लब्ध झाला आहे. लेडबीटरसारख्या माणसाच्या नादी लागून त्याला आसरा दिल्यानें बिझांटबाईवर आज नाचक्कीचा प्रसंग आला आहे. तरी पण, 'स्टार ऑफ धी ईस्ट' मधील कांहीं लोक ख्रिस्ती पायांसारखे आवाज काढीत अवता- राच्या गोष्टी सांगतच आहेत; आणि 'थिऑसॉफी' ही राजकीय आकांक्षेलाही सहाय्यक असल्याचेही प्रतिपादन होतच आहे. पण ते कांहींही असले तरी हट्टानें, कित्येक थिऑसॉफिस्टांच्या इच्छेविरुद्ध लेडबीटर यांस 'सोसायटी 'त घेतलें, त्यांना 'सोसायटीं 'त महत्त्वाचे जागीं ठेविलें, त्यांच्या तंत्राने वागून