पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नि:संशय अनीतिमान म्हणावी लागतात. असा माणूस मुलांना शिक्षण देण्याचे काम नालायख समजला जाईल. मुलांच्या सहवासांत असल्या माणसाला ठेवणें अत्यंत भयंकर आहे. मुले इंग्लंडांत आहेत, व त्यांचेवर इकडील कोर्टाचा हुकूम कसा चालेल ? असे प्रतिवादीतर्फे म्हणण्यांत आले. पण, मद्रास हायकोर्टाच्या हुकुमाची अंमलबजावणी करण्याचे काम इंग्लिश कोर्टाकडून सहाय्यच होईल अशावद्दल खात्री वाटते. "" तात्पर्य. अशा प्रकारें कृष्णमूर्तीच्या अवतारप्रवर्तनाचे खटपटींतून उपस्थित झालेल्या खटल्याचा निकाल झाला. मुलें ताव्यांतून गेली तरी तीं मोठी झाल्यावर जातात कोठें ? आपल्याचकडे येणार, असे बिझांटबाईना वाटत आहे; आणि सुखाच्या व बडेजावकीच्या मोहाला ती बळी पडल्यास असे होणें अशक्यही नाहीं. पण खटल्याचा निकाल विरुद्ध झाला तरी विझांटवाईचाच नव्हे तर 'सोसायटी'चा व' थिऑसॉफी ' चाही विजय झाला म्हणून कित्येक ' थिऑसॉफिस्ट ' नाचूं लागले ! मिसेस् विझांट यांना अभिनंदनपर तारा पाठवा म्हणून एका मुंबईकर ' थिऑसॉफिस्टा' ने पत्रव्यवहार करून ठेविलाच होता. इकडे 'सें. हिंदू कॉलेजां ' त या अवताराच्या मागे लागलेल्या लोकांची डाळ नीटशी शिजेना. मि. अरंडेल यांनी लिहिलेले एक पत्र 'लीडर' पत्रांत प्रसिद्ध झाले. त्यांत त्यांनी आपल्या पंथांतील बांधवांस म्हटले होतें कीं, बिझांटवाईना आपण परमेश्वरी विभूति मानतों व तिच्या मागून जाण्याचें आपण ठरविले आहे; तेव्हां त्यांनी कांहींही केले किंवा त्यांच्यांत कोणतेही दोष असले तरी आपण तिकडे लक्ष देण्याचें कांहीं कारण नाहीं. त्यांच्यासंबंधानें बन्यवाइटाचा निवाडा करीत न यसतां त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण वागले पाहिजे. हें पत्र प्रसिद्ध होतांच संता- पून जाऊन 'सें. हिंदू कॉलेजां'तील बिझांटभक्त प्रोफेसरांनी आपल्या जागांचे राजीनामे दिले. एवढेच नव्हे तर त्यांच्या गुरुमातेनें खुद्द बनारस येथेंच एक नवीन कॉलेज स्थापून 'सेंट्रल हिंदू कॉलेजा' शां स्पर्धा सुरू करण्याचीही तयारी केली आहे. पत्रांतील मजकूर जर खरा तर तो जगासमोर आल्याबद्दल या लोकांच्या अंगाची इतकी लाही का व्हावी, हे समजणे मोठें कठिण आहे. एव ढेर्से कोवळें पोर तें काय, पण त्याच्या पूर्वजन्मींच्या गोष्टी पुढे मांडून त्याला गुरु