पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० अवतार उबविण्याचें काम चालविलें, व 'हिंदु' पत्राचे संपादक किंवा डॉ. नायर यांच्यासारख्यांवर या संबंधांत अग्रू बिघडविल्याचा आरोप ठेवून खटले केले, त्यामुळे सारी घाण बाहेर पडून बिझांटवाईविषयों आतां जें लोकमत झाले आहे ते लवकर नाहीं से होणें आतां दुरापास्त आहे. त्रिकालाबाधित सत्य तत्वे अर्थात् कायमच आहेत; पण ती विवक्षित तऱ्हेनें सांगणाऱ्या माणसांच्या अधिकारानु रूप त्यांचा परिणाम लोकांवर होत असतो. मि. लेडवीटर यांचा 'डिअर अॅनी'- शीं झालेला पत्रव्यवहार वाचून कोणासही या धार्मिक विभूतीविषयों मोठा आदर वाटेलसें वाटत नाहीं. हीं पत्रे शक्य असेल त्यांनीं अवश्य वाचून पहावीं. तो या खटल्याच्या हकीकतींत प्रसिद्ध झाली आहेत. श्रद्धेसही सीमा असते. लोकांच्या धर्मभोळेपणावर किती बोजा टाकला तर चालेल याचा विचार न करितां 'विदुषी' व ' योगिनी ' बिझांटयाई वागल्या; आपल्या बुद्धिमत्तेवर व कर्तबगारीवर त्यांनीं फाजील भरंवसा ठेवला; आणि म्हणून त्यांच्या कृत्यांचें खरें स्वरूप लोकांच्या- लक्षांत आज विशेष स्पष्टपणें आलें आहे; आणि या काम व्यावहारिक धूर्ततेवर अहंकाराचें वर्चस्व मिसेस् बिझांट यांनों होऊं दिलें हैं शेवटों त्यापासून झालेल्या सत्याच्या आविष्करणाच्या दृष्टीनें इष्टच झाले यांत संशय नाहीं. हैं प्रकरण अत्यंत बोधप्रद झाले आहे. मादक पदार्थाच्या सेवनानें मति भ्रमते पण ती थोडा वेळ; त्या मानाने अंधश्रद्धेची गुंगी ही किती तरी ज्यास्त चढते व टिकते. मादक पदा- र्थाचे सेवन केलेच्या माणसाला मध्ये मध्ये तरी आपण व्यसननिमग्न झालों अस- ल्याची आठवण होते. पण अंधश्रद्धेची मदिरा प्राशन करणाराला आलेली गुंगी अभिमानास्पदच वाटत असल्यामुळे ती वाढतच जाते; आणि तिचा भर लवकर संपणे शक्य रहात नाहीं. सुशिक्षित म्हणविणारेही विवक्षित क्षेत्रांत विवक्षित शब्दांनी गुंगतात. तेव्हां बुद्धि स्थिर व शाबूत ठेवून, डोळे व कान उघडे ठेवून विचार जागृत राखण्याची आवश्यकता किती आहे, हे या प्रकरणांत प्रसिद्ध झालेल्या अंधश्रद्धेच्या मासल्यावरून दिसून येतें. आणि हें तत्व जर या प्रकरणा- मुळे लोकांच्या विशेष लक्षांत आले तर तें उपस्थित झालें-जो हो रहा है वो सव् अच्छेके वास्ते असें म्हणण्यास कोणतीच हरकत रहाणार नाहीं.