पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धरून चालतां येत नाहीं. मुलांचे शिक्षण आजपर्यंत खाजगी तऱ्हेनेंच चाललें व पुढे तरी तीं ऑक्सफर्डमध्यें पाठविली जातील असे मानण्यास आधार नाहीं. धर्मगुरु बनणाऱ्या वडील मुलाला युनिव्हर्सिटीच्या पदवीची आवश्यकता नाहीं, असें विझांटबाईच म्हणालेल्या आहेत. आपण परमेश्वरी विभूति असल्याची कल्पना मुलांच्या डोक्यांत शिरणे चांगले नाहीं. प्रतिवादीसारख्या वयोवृद्ध माण- सांनी कृष्णमूर्तीसारख्या पोरास पूज्य मानावें, त्याला एका पंथाचें मुख्य बनवावें, आणि अरुंडेलसारख्यांनी आपल्याला त्याचे सेक्रेटरी म्हणवावें, हें त्या मुलाच्या दृष्टीनें इष्ट कसें मानितां येईल ? यानें मानसिक व नैतिक दृष्टया मुलांची हानिच होणार आहे. हे प्रकरण कोर्टात जाणार असे वाटले तेव्हां प्रतिवादींनी लक्ष्मणाचा एक जवाब लिहून घेतला. त्याचप्रमाणे लेडबीटर यांनी नारायणय्यांना मुलांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. ' इनीशिएशन् ' चा विधि झाला तेव्हां कृष्णमूर्ति अड्यार येथें होता, मिसेस बिझांट या बनारस येथें होत्या; आणि विधि तिबेटांत झाला म्हणतात ! असल्या विधानावरून कोणत्याही मृत्युलोकांतल्या कोर्टाला काहींच हुकूम सोडतां येणार नाहीं हें उघड आहे. लेडबीटर हे कृष्णमूर्तीला नुसतें इंग्रजी पद्धतीनें स्नान कसे करावें हें शिकवीत होते, असें मानतां येत नाहीं. सध्यां मुलांचें शिक्षण मि. जिनराजदास यांचेवर सोपविण्यांत आले असून त्यांची मतें लेडवीटरसाहेबांसारखींच आहेत. मुलांना योग्य शिक्षण देण्याचे ऐवजी त्यांच्या डोक्यांत भलभलत्या कल्पना भरवून देण्यांत येत आहेत. तेव्हां मुलांना या परिस्थितीतून सोडविणें अवश्य आहे. " खटल्याचा निकाल. शेवटीं जस्टिस बेकवेल्ल यांनीं निकाल दिला की, " मिसेस् बिझांट यांनी मुलें वादीच्या स्वाधीन करावीं, कोर्ट मुलांना आपल्या ताव्यांत घेत आहे; आणि खटल्याचें काम लांबून पैसा खर्च झाला तो वादीनें प्रतिवादीवर केलेल्या आरोपामुळे झाला असल्याने आणि ते आरोप सिद्ध झाले नसल्यानें वादीनें दोनही बाजूंचा खर्च सोसावा. ज. बेकवेल्ल म्हाणाले कीं, लेडबीटर साहेबांना प्रथमपासूनच नारायणव्या हा आपल्या मार्गात एक अडथळा आहे असें वाटत होतें; आणि मुळे सर्वस्वों आपल्या ताब्यांत घेण्याची त्यांची इच्छा होती. लेडबीटरसाहेबांवरील गुन्हा शाबीत झाला नाहीं. पण, त्यांची मतें "C