पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांगितले होते. मुलांना मीं कांहीं उपदेश पूर्वी केला होता. त्यासंबंधीचीं माझीं तींच मर्ते अद्याप कायम आहेत. मी या बाबीचा विचार केवळ प्राणिधर्म- गुणांच्या दृष्टीनेंच करितों. पण मिसेस् बिझांट यांच्याकरितां मीं १९०६ साला- पासून हा उपदेश सांगण्याचें बंद केलें. ' चर्च ऑफ इंग्लंड ' मधून मी हा उप- देश मूळ शिकलो. मुलांच्या विचारांचे प्रवाह कसकसे वहातात हे माझ्या दृष्टीला दिसतें. प्रेमाशिवाय झालेला विवाह व वेश्यागमन हीं दोनही माझ्या उपायाच्या मानाने कमी योग्यतेचीं होत. ( मिसेस् बिझांट यांच्या प्रश्नास ) स्त्रिया व वाईट मुळे यांच्या नादांत गुंतूं नये म्हणून मी मागें कांही तरुणांना कांहीं उपदेश सांगितला होता. " कोर्टास उद्देशून केलेली भाषणें. मिसेस् बिझांट यांनीं कोर्टास उद्देशून भाषण केलें तेव्हां म्हटलें कीं, “ माझीं मुलें –कृष्णमूर्ति व नित्य- ह्रीं अत्यंत शुद्ध रत्ने आहेत. मि. लेड बीटर यांची कांहीं मतें त्यांच्या कानीं गेल्यानें त्यांची कांहीं हानि होणें नाहीं. हजारों सन्मान्य स्त्री-पुरुष लेडबीटर यांना पवित्र व निष्कलंक दानत असलेले धर्मगुरु मानितात, तेव्हां ते अनीतिमान माणूस आहेत, असें कोर्टानें मानूं नये. खट- ल्याचा निकाल वादीच्या बाजूचा झाल्यास कृष्णमूर्ति हा गुन्हेगार म्हणून डागला जाऊन, मि. लेडबीटर यांचें अवशिष्ट राहिलेले आयुष्य कलंकित होणार आहे. आणि माझ्या संबंधानें म्हणाल तर, मी म्हातारी झालेली आहे; आणि मी मुलांची पालक होण्यांत अपात्र ठरलें गेलें तर हजारों स्त्री-पुरुषांचे धर्मगुरु होण्यास मी नालायक मानिली जाईन. तेव्हां कोर्टानें माझ्या बाजूचा निकाल द्यावा. >> c वादीतर्फेचे वकील मि. सी. पी. रामस्वामी यांनी कोर्टाला उद्देशून केलेल्या अखेरच्या भाषणांत म्हटले की, " मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यास नारायणय्या हे तयार असून आत्तां सुरवातीस त्याबद्दल १०००० रु. ठेव म्हणून निराळे काढून ठेवण्यास ते तयार आहेत. कोर्टानें कोणाही योग्य व सन्माननीय गृहस्थाला मुलांचे मालक नेमाबें. मुलांप्रीत्यर्थ बाईंनी २७००० रु० खर्च केले. या गोष्टीबद्दल कांही पुरावा पुढे आलेला नाहीं. मुलांना इकडे यावेसे वाटत नाहीं म्हणाल तर त्यांना कोर्टात आणिले नव्हतें, तेव्हां त्यांची इच्छा अमूकच आहे असे