पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अड्यार येथे मि. लेडवीटर व मि. नारायणघ्या यांच्यांत एकदां शिवीगाळी झाली आणि लेडबीटर यांचें घाणेरडें कृत्य पाहिल्यासंबंधानें नारयणय्या हे १९१० च्या मे महिन्यांत म्हणाले होते, अशी साक्ष एस. व्ही. सुब्रह्मण्यं यांनी दिली. लक्ष्मण गड्यानें लेडबीटर व कृष्णमूर्ति यांना बहुतेक नग्न स्थितींत कसें पाहिले यासंबंधानें साक्ष दिली. " मिसेस् बिझांट यांनी आपल्या साक्षीत सांगितलें कीं, लेडबीटर हे कृष्ण- मूर्तीला, नग्न होऊन इंग्रजी तऱ्हेनें स्नान कसे करावें हें शिकवीत होते, दुसरें कांहीं नाहीं. लेडबीटर हे पूर्वी ' पायोनिअर 'मध्ये लेख लिहीत असत. ते मोठे पवित्र गृहस्थ आहेत. कृष्णमूर्ति याला धर्मगुरु होण्यास योग्य असें शिक्षण दिले जात असून नित्य यास ' आय. सी. एस. ' बनविण्याचा विचार आहे. मुलांना इंग्लंडला पाठविण्याविषयीं गोष्ट निघाली होती तेव्हां, त्यांना लेडबीटरपासून दूर राखण्याविषयीं नारायणग्या बोलले; पण मी त्यांना सांगितले कीं, तूर्त त्यांना दूर ठेवीन पण पुढेही ते सदैव तसेच दूर रहातील अशाबद्दल मी वचन देऊं शकत नाहीं. ' मी मुलांकरितां २७००० रु. खर्च केले असून सालीना १०००० रु. खर्च करण्यासंबंधानें मीं व्यवस्था केली आहे. माझ्या मृत्युपत्रांत सुमारे ६०० पौंडांचें सालीना उत्पन्न मी त्यांच्या नांवानें केले आहे. ( वकिलांच्या प्रश्नास ) ‘मास्तर ' हे मानवी सामर्थ्याबाहेर सामर्थ्य असलेले दिव्य पुरुष असून ते तिबेटांत असतात. या खटल्यांत पैशांसंबंधाने वगैरे मला दुसऱ्यांकडून मदत होत आहे. माझें शरीर हजर नसले तरी कृष्णमूर्तीच्या 'इनीशिएशन ' विधीचे वेळीं मी हजर होत्यें. मुलें तार्व्यात घेण्याची कारणे त्यासंबंधीच्या करारनाम्यांत घालण्याचें प्रयोजन आहेसे वाटले नाहीं, म्हणून तीं त्यांत घातलीं नाहींत. कांहीं वर्षानी मैत्रेयऋषि हे कृष्णमूर्तीच्या शरीराचा उपयोग करतील. " मि. लेडबीटर यांनी आपल्या साक्षीत सांगितले की, कृष्णमूर्तीसंबंधानें व माझ्या संबंधानें केलेले विधान म्हणजे घोर असत्य होय. कृष्णमूर्ति यास मी सदैव पूज्य व सन्माननीय मानीत आलो आहे. ( वकिलांच्या प्रश्नास ) अतीं- द्रियज्ञान प्राप्त करून घेण्यासंबंधानें मीं व विझीट यांनी मिळून प्रयोग करून पाहिले मीं ज्ञानानें ग्रह पाहिले आहेत. 'उत्क्रांतीच्या सूत्रधाराला ' मी पाहिल्याचें ((