पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांनी आपल्या साक्षीत सांगितले की, " ऑर्डर ऑफ धि स्टार इन् धि ईस्ट या पंथाचा फैलाव ' सें. हिंदू कॉलेज' मध्ये जोराने होत आहे हे वाईट असें गाऱ्हाणें मिसेस् बिझांट यांचे जवळ करण्यांत आले होतें. पण यांनीं या ‘ ऑर्डर ' ची छापील पत्रकें विलायतेस तयार करून इकडे पाठविलीं. बिझट- बाई या ' ऑर्डरच्या संरक्षक बनल्या. कृष्णमूर्ति हे या पंथाचे मुख्य आणि ‘ से. हिंदू कॉलेज ' चे प्रिं. अरुंडेल हे व इतर प्रोफेसर आणि मास्तर हे त्यांचे निरनिराळ्या प्रकारचे सेक्रेटरी असल्याचे जाहीर झाले होतें. " , "" मि. धनकृष्ण विश्वास – हे ' सोसायटी ' च्या हिंदी शाखेचे १८९९ ते १९०७ पर्यंत अ. सेक्रेटरी होते-यांनी आपल्या साक्षांत सांगितलें कीं, लेडबीटरसाहे- बांनी मुलांना उपदेश केला तो त्यांना सहाय्य व्हावे म्हणून केला, असें म्हणून बिझांटवाई त्यांचे समर्थन करीत होत्या. " मुंबईचे मि. जे. जे. विमादलाल यांनी आपल्या साक्षीत सांगितले की, कृष्णमूर्तीच्या गळ्यांत मुंबई येथें लोकांनी पुष्पहार घालून त्याला बिझांटबाईच्या बरोबरीनें मान दिला. (6 " वादी नारायणय्या यांनी सांगितले की, “ कृष्णमूर्ति याच्यासंबंधानें कांहीं तरी मोठी चांगली व महत्त्वाची गोष्ट होणार आहे, असें १९०९ सालीं बिझांटवाई मला म्हणाल्या; तेव्हां ' काय होणार आहे ? असा प्रश्न मीं केला असतां त्या मला म्हणाल्या, 'पुढे कळेल; पण तुम्ही मि. लेडबीटर यांच्या मार्गात अडथळे मात्र आणूं नका. ' १९१० सालों बाई मला म्हणाल्या, ' तुम्ही मला धार्मिक बबातीत तुमचे गुरु मानिता. त्याचप्रमाणे ' मास्टरां'शीं माझें बोलणे चालणें होतें यावर तुमचा विश्वास आहे ना ? मग काय ? तुम्ही मला त्रास देणार नाहीं हें खरें; पण तुमच्या मृत्यूनंतर तुमचे आप्त तक्रार करतील असा संभव आहे. तेव्हां मुलांसंबंधानें पालकाचे हक्क मला लिहून द्या. तेव्हां मुलांचें विलायतेस शिक्षण होईल या आशेनें मी तसे लिहून दिलें. मुलांना विलायतेस नेण्यासंबंधाने मी अनुमति दिली; तेव्हां त्यांना लेडबीटर यांजकडे इटालींत नेतील अशी कल्पना देखील मला झाली नव्हती. "