पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगतीत मुलांना ठेवण्यासंबंधानें हरकत घेतली नाहीं. वादीनें आपल्या मुलांमा दोन वर्षे त्यांच्या अगदीं निकट सहवासांत राहूं दिले. वादी लेडबीटर यांच्याशीं सलोख्यानें वागत असे. ता. ३१ डिसेंबर १९११ रोजी वादी प्रतिवादी कडे आला; आणि कांहीं एक कारण न सांगतां मुलांपासून लेडबीटर यांना दूर करा म्हणूं लागला, पण प्रतिवादीनें तें कबूल केलें नाहीं. ता. १९ जानेवारी रोजी प्रतिवादीनें वादीला कांहीं मिलांसमोर बोलावून आणिलें असतां, आतां करतो तसली तक्रार प्रतिवादीजवळ पूर्वी न केल्याचे वादीनें कबूल केलें होतें. त्याच- प्रमाणें वादीनें या प्रसंगी मुलांना विलायतेस पाठविण्याविषयीं अनुमतिही दिली. लेडबीटरपासून मुलांना दूर ठेवण्याचें वगैरे कोणतेंही वचन प्रतिवादीनें वादीला या प्रसंगी दिले नाहीं. मि. लेडबीटर यांच्या वाईट खोडीसंबंधानें प्रतिवादीला बिल- कुल माहिती नव्हती. साहेब मजकुरांचें चरित्र पवित्र आहे असे त्यांच्या दानतीसंबंधं जो तेवीस वर्षांचा अनुभव आहे त्यावरून आणि त्यांनी मुलांना सहाय्य केल्याबद्दल कित्येक मातापितरांनों ज्या साक्षी दिल्या आहेत त्यांवरून, प्रतिवादी म्हणत आहे. सध्यां मुले इंग्लंडांत ना. जेकब ब्राइट यांच्या विधवा स्त्रीच्या आश्रयाखाली रहात असून त्यांची नांवें ' ऑक्सकर्ड युनिव्हर्सिटी त दाखल करण्यांत आली आहेत. त्यांना शिकविण्याकरितां ' सें. हिंदू कॉलेज 'चे प्रिं. अरंडेल यांची योजना केलेली आहे. मुलांनाही वादीकडे परत जाण्याची इच्छा नाहीं. "" खटल्यांतील साक्षी. नंतर खटल्याचे काम चाललें. वादीतर्फे मि. सी. पी. रामस्वामी आय्यर हे वकील असून प्रतिवादी आपल्या तर्फेचें काम स्वतःच चालवीत होत्या. मुंबईचे मि. विमादलाल, मि. बीम कीटले, बाबू भगवानदास, मि. विश्वास, वगैरे गृह- स्थांच्या साक्षीचें प्रकरण उपस्थित होऊन, मिसेस बिझांट यांना ' थिऑसॉफिस्टी' कडून मिळणारी पूजा, मि. लेडबीटर यांची वर्तणूक, लेडबीटर यांनी कृष्णमूर्ती- संबंधानें ' डियर ॲनी ' ला ( मिसेस् विझांट यांस ) पाठविलेली पत्रे, 'विश्वाच्या उत्क्रांतीच्या मुख्य सूत्रधाराचें ' लेडबीटर व बिझांट यांना झालेलें दर्शन (?), लेडबीटर यांचे' परमेश्वर स्वरूपाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोंचलेला इसम असे करण्यात आलेले वर्णन, वगैरे विषय पुराव्यांत आले. बाबू भगवानदास ,