पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ वादीचा पूर्वी समज होता व प्रतिवादीला पूज्य मानून प्रत्यक्ष तसा मान तो देतही असे. पुढे प्रतिवादीला वादीच्या मुलांचे पालक नेमावें अशाबद्दल पत्र लिहून देण्याविषयों प्रतिवादीनें वादीचें मन वळविलें; व १९१० सालच्या सुरुवातीस वादीनें तसे पत्र लिहून दिलें. पण, लेडबीटरसाहेब कृष्णमूर्तीला अयोग्य व भयंकर संवयी लावितात असे आढळून आले. तेव्हां वादीनें प्रतिवादीजवळ तक्रार नेली; आणि प्रतिवादीनें लेडबीटर यांजपासून मुलांना दूर ठेवण्याचें वचनही दिलें; पण पुढे त्याप्रमाणे वर्तन केलें नाहीं. बनारस येथें वादीनें पुनः तक्रार केली; तेव्हां प्रतिवादी बाई म्हणाली, ‘ गेले कित्येक जन्म हीं मुलें व लेडबी- टर एकत्र होते; आणि लेडबीटर ईश्वरप्राय सत्पुरुष आहेत; त्यांच्यापासून मुलांना दूर ठेवणे शक्य नाहीं. ' पण हें वादीला कबूल झाले नाहीं. वादीचा वडील मुलगा कृष्णमूर्ति हा ख्रिस्त आहे, अथवा तो मैत्रेयऋषि आहे किंवा होणार आहे, असें म्हणत असतात. या मुलाला देवता बनविण्यांत येत असून कित्येक सन्मान्य वाटणारे शिष्ट त्याच्यापुढे लोटांगणें घालतात व त्याचा इतर प्रकारें मोठा सन्मान करितात. शिवाय कृष्णमूर्तीच्या नावानें खपणारें पुस्तकही लेडबीटर यांनीच लिहिलेले असावें, अर्से मानण्यास कारण आहे. पालकाचे इक्क वादीनें प्रतिवादीच्या हवालीं केले तेव्हां वादी पूर्णपणे श्रद्धाळू, व प्रतिवादीवर सर्वथैव विश्वासून रहाणारा होता; म्हणजे अशा स्थितीत झालेला करारनामा अयोग्य वजन पडून ' झाला असें होतें व मग तो रद्द समजणें भाग होतें. फिर्याद लावण्याचे काम विलंब झाला; याचें कारण हेच कीं, इतर कित्येकांप्रमाणें वादी हा प्रतिवादीला ईश्वर अंश असलेली विभूति मानीत होता, आणि आपल्या विनं- तीला मान देऊन कबूल केल्याप्रमाणे प्रतिवादी मुलांना लेडबीटरपासून दूर करील अशी आशा वादीला वाटत होती. त्याचप्रमाणे प्रतिवादी परदेशों गेल्यानेही फिर्याद लावण्यास विलंब झाला. पण वादीचा सारा समज ता. ७ फेब्रुवारी १९१२ च्या प्रतिवादीच्या पत्रानें नाहींसा; झाला तेव्हां ही फिर्याद दाखल झाली. " असें वादी नारायणय्यांचे म्हणणे होतें. मिसेस विझांट यांचे म्हणणे. उलटपक्षी प्रतिवादी मिसेस विझांट यांनी आपल्या जवाबांत म्हटलें होतें कीं, कृष्णमूर्ति व लेडबीटर यांच्या संबंधीचे विधान खोटें व मत्सरानें केलेले आहे. लेडबीटर यांच्या वर्तनासंबंधानें वादीनें कधीं तक्रार केली नाहीं; किंवा त्यांच्या ((