पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डले. लेडबीटरसाहेब एकाएकी बनारस येथून अदृश्य झाले ते युरोपांत गेले होते; त्यांची व कृष्णमूर्ति आणि नित्य यांची गांठही तिकडे पडलीच. तेव्हां नाइलाज होऊन नारायणग्यांनी मितेस् विझांट यांस स्पष्ट कळविलें कीं, ता. ३१ आगस्ट १९१२ चे अंत माझी मुले माझ्या हवाली करा, नाहीं तर मला कायद्याचा अवलंब करावा लागेल. खटल्यास सुरुवात. त्याप्रमाणे अखेर नारायणय्या यांनी मिसेस् बिझांट यांचे विरुद्ध खटलाच दाखल करावा लागला. या खटल्यांत प्रतिवादी मिसेस् आनि बिझांट यांनीं एक जबाब प्रथम दाखल केला. त्यांत असे म्हटले होतें कीं, " या फिर्यादीचे मुळाशीं राजकीय हेतु व व्यक्तिविषयक मत्सर असून प्रतिवादीस इजा पोहोचविण्याचा उद्देश आहे. जहालांच्या कटांतून सामील होण्यापासून हिंदुस्थानांतील विद्यार्थि वर्गाला परावृत्त करून साम्राज्यासंबंधाची निष्ठा त्यांच्यांत स्फुरित करण्याचा प्रयत्न प्रतिवादीनें केल्यामुळे प्रतिवादीचा जीव किंवा कीर्ति यांचा नाश करण्याचा कित्येकांनी विडाच उचललेला आहे. लार्ड कर्झन हे हिंदुस्थानाचे व्हाइसरॉय असतांना मुलांच्या गुप्त कवाइती व हत्यारें गोळा करणे महाराष्ट्रांत चाललें होतें तें बंद करण्याचे कामांत प्रतिवादी पडल्यापासून, विद्यार्थ्यांमधील अत्याचाराच्या चळवळीस हा एक अडथळाच आहे अर्से ध्यानात येऊन, तिचा जीव घेण्याची धमकी देण्यांत आली "... .“ वादी हा शरीराने व मनानें दुवळा आहे. त्याला लोकांनी बनविला आहे. माझ्या ताव्यांतून मुले त्याच्या ताब्यांत दिली तर तीं मुले इंग्रजांचा द्वेष करावयास शिकतील " असला मजकूर जबाबांत असून ब्रिटिश राज्य उलथविण्याच्या उद्देशाने केलेले जहालांचे कट, अमेरिकेतील टिंग्ले बाई, डॉ. नाजुंडाराव व ' हिंदू ' पत्र यांनी मिळून हे प्रकरण उपस्थित केलें असें बिझांट- बाईचें म्हणणे होतें. पण, या जबावांत गैरलागू मजकूर घालून पाल्हाळ केला आहे; तेव्हां नवा जबाब लिहून दाखल करावा, असें कोर्टानें फर्माविलें; आणि हा हुकूम देतांना म्हटलें कों, ' बिझांटवाईना अशा रीतीनें दशदिशा अब्रक्षेपण करण्याचे कांहीं एक प्रयोजन नव्हतें. 1 7 मि. नारायणय्या यांचे म्हणणे. वादी मि. नारायणव्या यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलें होतें कीं, " मानवांचें अंगी असतात त्याहून उच्च गुण प्रतिवादींत घसत आहेत, असा ♦