पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० कायद्याचा अवलंबन करावयाचा असा माझा निश्चय झालेला आहे. तुमच्याखेरीज दुसऱ्या कोणातर्फे या गोष्टीस इलाज करावयास जाणे म्हणजे माझीच नव्हे तर माझ्या मुलांची कायमची अपकीर्ति करून घेणेच आहे. पण, लेडबीटरसारख्या जुन्या गुन्हेगाराच्या ताब्यांत मुले राहिल्याने त्यांचा सत्यनास होईल असे मला खात्रीपूर्वक वाटत असल्यामुळे हा स्वार्थत्यागही करावयास मी सिद्ध झालों आहे दयापूर्ण देव तुम्हांस मजवर दया करण्याची बुद्धि देवो " यावर मिसेस आनि बिझांट यांनी मुलांना हिंदुस्थानांतून उचलून अजीबात विलायतेस नेऊन ठेवण्याचे ठरविलें, आणि याविषयों नारायणय्या यांनी संमति दिल्यावर ता. ६ फेब्रुवारी रोज बिझौटबाई विलायतेस निघून गेल्या. ता. ७ व १५ फेब्रु. १९१२ रोजी नारायणग्या यांनी लक्ष्मण गड्याने पाहिलेल्या लेटबीटरसाहेबांच्या कृत्या- विषयींची सविस्तर माहिती पत्रद्वारें बिझांटबाईना कळविली. पण आत्तांपर्येत धिमेपणा पत्करून स्थिरस्थावर करणाऱ्या बिझांटबाईनी इंडिडे- यन ओशन ' मधून पत्र लिहून नारायणयांस कळविले की, “ तुम्ही आतां अड्यार येथून निघूनच जावें हें बरें, तुम्ही आपल्या मुलांसंबंधानें अड्यार व बनारस येथें जें विधान केलेत ते खरे असले तरी दुसरा कोणताही बाप आपल्या मुलांसंबंधानें असले विधान करण्यापेक्षां मरण पत्करता. पण हे तुमचें विधाम खरें असतें तर तुम्ही अडधार येथून निघूनच गेला असतां, आणि आपली मुलें तुम्हीं माझ्या ताब्यात दिलींचं नसत. तुमचे म्हणणे ज्या कांहीं सन्मान्य गृह- स्थांच्या कानी गेले त्यांचे मत असेच असून कोणत्याही न्यायाच्या कोर्टाचें मत- ही असेच होईल. तुम्हीं मला लिहून दिलेला करारनामा आतां रद्द करूं पहाल तर मी असे सिद्ध करावयास तयार आहे की, मी आपल्या ताब्यांत मुले घेतलीं तेव्हां त्यांना पोटभर खावयास मिळत नव्हते, त्यांना मारहाण केली जात होती, त्यांना घाणेरडे ठेवण्यांत येत होतें, आणि त्यांना नरकवासांत एकसारखें तुमच्या धास्तीत रहावें लागत होते. आतां तीं मुलें निर्भय, मोकळीं व आरोग्यसंपन्न गृहस्थ बनली आहेत....... • आर्ता तुमच्यापासून आपलें संरक्षण करून घेण्यास समर्थ होईतों-पूर्ण वयांत येईतों-तीं मुले हिंदुस्थानांत परत येणार नाहींत. " असें बिझांटबाईनीं स्पष्ट लिहिलें. 'पूज्य व प्रिय मातोश्रीं' नीं जेव्हां आपलें हें खरें स्वरूप दाखविलें तेव्हां ' कर्तव्यनिष्ठ पुत्र' नारायणय्या यांचे डोळे लक्कन उघ- 1