पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४

दिला. त्याची सनद उपलब्ध झाली आहे, ती वाचकांच्या माहितीकरितां येथें देतों :-

अस्सलवरून नक्कल

सन १७६३

श्री
राजमान्य राजश्री दाजीबा त्र्यंबक गोसावी यांस-

 स्ने ॥ सदाशीव चिमणाजी सचीव आसिर्वाद सुमा आर्बा सीतैन मयाव अलफ तुझी संस्थानांत श्रम साहस करून सरकार उपयोगी बहुत पडला आणि लिहीणार सरंदाज ऐसें जाणून पहिल्यापासून दप्तरदारीचा दरक संव- स्थानांत नाहीं तो तुम्हांस खुद जातीस सांगोन वेतन सालीना ३०० तीनसे करार करून दिल्हे असे तरी इमाने इतबारें दप्तरदारीचें दरकाचें कामकाज करीत जाणें नेमणुके प्रो वेतन पावेल जाणिजे छ १ माहे x x हुजूर (शिक्का) मोर्तब सूद.

 ह्याखेरीज त्यांनी आणखीहि पराक्रमाची व मुत्सद्देगिरीची अनेक कामें केल्यामुळे सचिवानें त्यांस आपल्या दिवाणागिरीचीं वस्त्रे दिली होती.  दुसरा मैराळ हा कोटनिसीचा दरक संभाळून होता. तिसरा खंडेराव यासंबंधी कांहीच माहिती उपलब्ध नाहीं; परंतु त्याचा मुलगा सदाशीव फारच पराक्रमी व मुत्सद्दी होता. त्यानें सचिवाच्या दौलतीचा कारभार व संस्थानच्या संरक्षणार्थ शत्रूंबरोबर अनेक लढाया केल्या. ह्या त्याच्या परा- क्रमाचें पारितोषक म्हणून सचिवानें त्यांस पौन मावळांतील "साठेसाही " हा गांव इनाम दिला. ह्यानेंच सन १८५७ बंडाच्या वेळी बंडखोरांच्या पारि