पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पत्याकरितां इंग्रजांस मदत केली. म्हणून त्यांस कंपनी सरकारकडून मावळांतील " वांगणी " हा गांव इनाम मिळाला. वरीलप्रमाणे ह्या सुप्रसिद्ध घराण्यांतील पुरुषांची व त्यांच्या पराक्रमाची उपलब्ध झालेली शक्य ती माहिती दिली आहे. अद्याप पुष्कळ माहिती उपलब्ध होणें आहे. ती झाल्यास सदरहू घराण्याचा महत्वाचा इतिहास प्रसिद्ध होईल, करितां ह्या घराण्यांतील मंडळीने आपल्या पूर्वजांची ऐतिहासिक माहिती शक्य ती प्रसिद्ध करावी, तेणेंकरून महाराष्ट्राच्या इतिहासांत भर पाडावी, अशी त्यांस आमची नम्र सूचना आहे.

 या दिक्षीत उर्फ दिघे घराण्याच्या दोन्ही शाखांचा वंशवृक्ष फारच विस्तृत आहे. तो हल्लींच्या परिस्थितीत छापून प्रसिद्ध करणे आम्हांस शक्य नसल्यामुळे, फक्त चरित्राच्या महत्वापुरताच येथें दिला आहे. मुठेखोयांतील दिघ्यांचा वंश. वृक्ष अप्रसिद्धच आहे; परंतु मोसेखोरेकर दिघे, यांचा वंशवृक्ष सन १९०३ मध्यें बडोदें येथील कै. चौककर यांनी प्रसिद्ध केला आहे.

 असो ! ह्या घराण्यांतील ऐतिहासिक माहिती ज्यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यांचें अभिनंदन करून लेखणी थांबविण्यापूर्वी इतकीच इच्छा प्रदर्शित करितों की, आज चरित्रनायकाचें देहावसान होऊन सुमारे २५४ वर्षांनी त्यांच्या कीर्ति- ध्वजांची आठवण महाराष्ट्रीय वाचकांस करून देत आहे. त्याचा आदर त्यांजकडून होईल अशी पूर्ण उमेद आहे.

समाप्त.