पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यानें अनेक प्रसंगी गुप्त हेराची व अनेक लढाईत शौर्याची कामे करून आपला पराक्रम महाराष्ट्राच्या इतिहासांत चिरंतन करून ठेविला आहे. शिवाजी महाराज, राजाराम महाराज व पंत सचीव यांनी त्यांस त्याच्या पराक्रमाचें पारितोषिक ह्मणून अनेक गांवें इनाम दिल्याच्या सनदा आहेत. हा शूर सरदार सन १६९४ त मांगलांचा सरदार, शाबादीखान, यानें तोरणा किल्यास वेढा घातला. त्याज- बरोबर लढत असतां धारातीर्थी पतन पावला.

 आबाजी विश्वनाथ धारातीर्थी पतन पावला ही बातमी राजाराम महाराजांस व शंकराजी नारायण सचिवांस कळली. तेव्हां त्यांस फार वाईट वाटले. त्यावेळी त्याचा मुलगा जनाजी हा अज्ञान होता. तरी त्यांस त्याच्या वडिलांच्या पराक्रमाची जाणीव होऊन, जनाजीची सरदारांत नेमणूक करून एक गांव वंशपरंपरा इनाम देऊन, खेरीज एक हजार होन सरंजामी करून दिली, त्या सनदेची अस्सलवरून केलेली नकल त्यांचे वंशजांकडून मिळाली आहे. ती वाचकांचे माहितीकरितां येथे देतों.

श्री
श्री
शंकराजी
नारायण.

 वर्क सनद म॥ जनाजी आबाजी सभासद प्रयोजन लेखक सबनिसी दिम्मत खासखेली हासम पावली सुरु सन सीत तिसैन अलफ-मशारनिल्हेचे चाप आबाजी विश्वनाथ हे किल्ले प्रसन्नगडीं नामजाद होते किल्लेमजकुर साल