पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६

परंतु परवशेतेनें गांजून गेल्यामुळे धुळीस मिळालेल्या महाराष्ट्रीयांच्या ठायीं स्वातं- त्र्येच्छा उत्पन्न करून, त्यांची शौर्यश्री एकवार जगावर गाजावण्यास ती पूर्वजांची उदाहरणेंच कारणीभूत झाली व पुढेंहि होतील.

 वरील प्रमाणेच या दिघे, देशपांडे घराण्यांतील कित्येक नर-रत्ने बहा. मनी राज्यांत व त्याचें विभागांत, आपल्या मर्दुमकीनें, व मुत्सद्दनिरीनें, प्रसिद्धिस आली. याच वंशांतील सोबत दिलेल्या वंशांवळातील मूळपुरुष गोपाळ प्रभु हा बहामनी राज्यांत, पाली उर्फ अमीनाबद येथें देशमुखांचे वतनावर होता. त्याच्यापूर्वी हें वतन कोणी संपादन केलें. ह्याची माहिती उपलब्ध झालेली नाहीं. सदरहू गोपाळप्रभुस दोन पुत्र होते; ते - मीउप्रभुजोगदप्रभु-मीठप्रभु मोसेखोरें येथील वतन संपादन करून प्रसिद्धीस आला. त्याचे वंशजांस मोसेखोरेकर म्हणतात. व जोगदप्रभु यानें पौडखोरें व मुठखारें येथील वतन संपादन करून तो प्रसिद्धीस आला. ह्याप्रमाणे ह्या घराण्याच्या अनुक्रमें मोसेखोरेंकर व मुठेखोरेंकर अशा दोन शाखा झाल्या.

 मोसेखोयांतील चरित्रनायक व त्यांचे चिरंजीव रामाजी हे शिवाजी महाराजांचें कारकीर्दीत एकनिष्ठेनें स्वराजसेवा व्यक्त करून प्रसिद्धीस आले. पुढे ह्या घराण्यांतील पुरुष छत्रपति शाहूमहाराजांचें कारकीदीअखेरपर्यंत, अनेक हुद्यावर असलेल्याची माहिती उपलब्ध होते. तथापि पुढील पेशवाईत ह्या सुप्रसिद्ध घरांण्यांतील वंशजांच्या पराक्रमाचा ठावठिकाणा लागत नाही. असो !

 सदरहू घराण्याच्या दुसऱ्या शाखेतील आबाजी विश्वनाथ दिघे, हा सन १६४९ त शिवाजी महाराजांकडे नामजादा, ह्या हुद्यावर प्रथम नोकरीत राहून