पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपसंहार.
स एव धन्यो विपदि स्वरूपं न विमुंचति ।

 (विपत्काल प्राप्त झाला असतांहि जे आपले स्वरूप म्हणजे आचरण बदलीत नाहींत तेच धन्य ).

 आजपर्यंत या भरतखंडांत अनेक राजे होऊन गेले, व अनेक राज्ये उदयास्त पावली. त्यांचा पुराणांतरीं इतिहास वाचिला असतां, असें दिसून येईल कीं, ज्या स्वसुखनिरभिलाष पुरुषांनी, मागें स्वपराक्रमाच्या जोरावर मोठमोठी राज्ये स्थापून, आपल्या धवल यशानें आर्यवंश धन्य केलें, त्यांना तीं महत् कार्ये संपादण्यांत थोडी संकटें किंवा थोडे हाल सोसावे लागले नाहीत, त्यांजवर जे जे, भयंकर प्रसंग गुदरले, व स्वातंत्र्य सुखाकरितां किंवा सदैव पूज्य अशा आपल्या पूर्वजांचा तेजस्वीपणा कायम राखण्याकरितां त्यांनी आपल्या जिवाचें जे स्वाहाकार केले, त्यांचा विचार केला असतां, असें खचित वाटतें कीं, त्यांच्या आंगीं विलक्षण धैर्य व असाधारण स्वाभिमान नसता, तर त्यांचा कुलदीपकपणा व त्यांच्या अपूर्व पराक्रमाचा महिमा आजवर त्रैलोक्यांत खचितच दुमदुमत रहाता ना. त्यांनी संपादिलेले ऐश्वर्य व त्यांनी स्थापिलेली राज्ये, उत्कर्ष आणि अपकर्ष, त्या अवस्थाद्वयास भोगून जरी नाहींशी झाली, किंवा आज- मिर्तास त्यांचा मागमूस देखील राहिला नाहीं, तरी तीं संपादण्याचे कामीं. त्यांनी घेतलेले अश्रांत श्रम, व त्यांजवर कोसळलेल्या अरिष्टांतून पार पाडण्या- करितां त्यांनीं योजिलेले शहाणपणाचे उपाय, गुरुस्थानी होऊन, आपल्यास अद्याप पढवीत आहेत, इतकेच नव्हे, तर ते सदोदित असेंच पढवीत रहातील,