पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३

रुचे वीराला ! न रुचे क्षणमात्र अपयशाचें !!" या क्षत्रिय धर्माप्रमाणेच वर्तन केलें. शत्रूच्या अफाट सेनासमूहाबरोबर हजार दोन हजार मावळ्यांचा किती निभाव लागणार ? परंतु ह्या तिन्ही वीरांनी आपला देह रणांगणी अर्पण करीपर्यंत दिल्लेरखानाचा किल्ल्यांत शिरकाव होऊं दिला नाहीं. शेवटी निरुपायास्तव म्हणा किंवा ह्या वीरांच्या पराक्रमाची जाणीव होऊन दिल्लेरखानाने ह्या युद्धाचा शेवट तात्पूर्ता तह करून केला. दिल्लेरखानास स्वपराक्रमानें किल्ला पहावयास मिळाला नाहीं. तेव्हां ह्या तहानंतर त्यानें किल्ला पहाण्याची इच्छा तृप्त करून घेण्याचा मानस शिवाजीस कळविला. शिवाजीनें तें त्याचें ह्मणणें करून किल्यावर मोठा दरबार भरविला. त्यावेळी चरित्रनायक, निराजी आनंदराव, नागोजी फर्जद, हिरोजी फर्जद वगैरे वीस पंचवीस मातबर " सरदारांचे अंगांवर जवाहिराचे व मोत्याचे कंठे, तुरे आणि अंगावर भरगच्ची पोशाख महाराजांनी देऊन दरबार मोठ्या थाटाचा भरविला.

 चरित्रनायकांचे घराणे पुरातन वतनदार असून धनसंपन्न होतें, त्यामुळे दरबारांत चरित्रनायक मानकरी या नात्यानें असत. त्याखेरीज त्यांनीं शिवाजीमहाराजांस स्वराज्य स्थापण्यास प्रथमपासून शौर्यानें, धैर्यानें व मुत्स- द्दोगरीनें मदत करून मराठ्यांचा भगवा झेंडा सर्वत्र प्रसिद्ध करून आपले नांव ह्या महाराष्ट्राच्या इतिहासांत अजरामर करून, आपले वयाचे ५५ वर्षी म्हणजे सन १६७० त आपला देह विसर्जन केली. ही बातमी महाराजांस समजली तेव्हां त्यांचा हृदयगिरी या दुःख वज्रानें भेदून गेला. स्वातंत्र्याच्या मोहिमेस प्रारंभापासून मदत केलेल्या आपल्या मित्राचा अंत झाला. हे ऐकून महाराजांस फारच दुःख झाले त्यांच्या उच्च मनोरथसिद्धीचें खरें साधन नष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या विवेकी व विरक्त मनाची देखील चमत्कारिक स्थिती व्हावी ह्यांत आश्चर्य तें काय ?