पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२

नायकानें जो विलक्षण पराक्रम केला, तो फारच अवर्णनीय होता. त्यांनीं त्या खिंडीत असा कांहीं मोर्चा धरला की, रायबागिणीच्या सैन्यास खिंडीतच कोंडून टाकल्यामुळे त्यांच्या युद्ध सामुग्रीचा कांहींच उपयोग न होतां, त्यांस मावळे सरदारांच्या स्वाधीन व्हावें लागलें. ह्या लुटीत मोगलांचा दक्षिण प्रांताचा खजिना त्यांस मिळाला तो निराळाच, त्या खेरीज हत्ती, घोडे, उंट, डेरे, दांडे वगैरे उत्तम लाढाईची सामुग्री मिळाली. सदरहू लुटींत विजयीं झालेल्या सरदारांस महाराजाने हत्ती, घोडे वगैरे बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला.

 वरील हकीकत औरंगजेबास कळली, तेव्हां त्यांस मगठ्यांचा फारच संताप आला, त्यांचा सूड घेण्याकरितां, त्यांनी आपला सरदार शाहिस्तेखान याजबरोबर प्रचंड सैन्य देऊन दक्षिणेत पाठविला. त्याची वासलाद शिवाजीनें आपले बालमित्र दादजी बापुजी व चिमणाजी बापुजी देशपांडे या बुंधुद्वयाच्या साह्यानें सन १६६२ त कशी लाविली. हें इतिहास प्रसिद्धच आहे.

 शाहिस्तेखानासारखा शूर, मर्द व मुत्सद्दी सरदार नामोहर होऊन पळून गेला. तेव्हां तर औरंगजेब फारच घाबरला, परंतु तो स्वतः दुष्ट स्वभावाचा असल्यामुळे, त्यानें शिवाजीवर मिरझाराजे व दिल्लेरखान ह्या पराक्रमी सरदांराबरोबर ऐशी हजार सैन्य देऊन पाठविले. ते दोघे सिंहगड व पुरंदर या दोन किल्ल्याचे दरम्यान येऊन राहिले. दिल्लेरखान पुरंदर घेण्याकरितां मोठ्या हिंमतीनें निघाला. त्यावेळी पुरंदरचा किल्लेदार सरदार मुरार बाजी देशपांडे व 'रुद्रमाळ्याचे किल्लेदार बाबाजी बोवाजी व यशवंतराव बोवाजी या वीरांचे--प्रसिद्ध महाराष्ट्र कविवर्य मोरोपंत यांनी म्हटले आहे की,"मरण