पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४१

मराठ्यांचा मोर्चा मोगलांच्या मुलखाकडे वळला. त्यावेळी मोगलांचा दौलताबाद येथील सुभेदार हुकूमसिंग, फारच घाबरून गेला. त्यानें त्वरित दिल्लीस कळविलें कीं, "मराठ्यानें इकडे आपल्या प्रांतांतील मुलूख लुटून उध्वस्त करण्याची सुरवात केली आहे. तरी त्यांच पारिपत्य वेळींच न झाल्यास पुढें आपणांस जड जाईल, करितां कळवीत आहे." त्यांस पादशहाकडून उत्तर आलें कीं, तुम्हीं पुरुष असून तुमच्यानें सुभ्याच्या बंदोबस्ताचें काम होत नाहीं. मर्द असतां नामर्द झालांत ! तेव्हां ह्रीं कामें बायकांच करतील ! व आम्ही त्यांच्याकडून करवून घेऊं.त्याप्रमाणें मोगला कडून माहूरकर उदाराम देशमुख याची बहीण रायबागोण ही मोठ्या धैर्याची व शूर स्त्री होती, तिची दक्षिण प्रांताच्या सुभ्यावर नेमणूक केली. ह्यावेळी मोगलांचा खजीना कोंकण प्रांतांतून येणें फारच दुरापास्त झाला होता. ह्मणून तिजला मुद्दाम कोंकण प्रांताचा खजीना आणण्याकरितां, मोठी फौज देऊन पाठविली. ती कोंकणप्रांतांतील खजीना उमरखिंडीच्या मार्गानें घेऊन येत आहे. ही बातमी महाराजांस समजली. तेव्हां त्यांनीं तो खजीना लुटून आणण्याकरितां चरित्रनायक, यशवंतराव रामाजी नाडकर, बोराटीकर रामाजी पाटील यांस पाठविलें. ते प्रत्येकी आपल्या पांच हजारी मावळे लोकांसह त्या कार्यावर निघाले.

 रायबागीण ही मोठी हिंम्मतवान व शूर बायको होती. हें वर दिलेच आहे. तिची व शिवाजीकडील मावळे सरदारांची गांठ उमरखिंडीत पडली. दोन्ही फौजा मोठ्या निकरानें लहूं लागल्या. कोणी कोणांस हार जाईनात. त्यावेळी चरित्रनाय कानें मोठ्या युक्तीनें आपलें सैन्य मागें घेऊन, खिंडीचा मोर्चा धरून बसविलें, तोंच मोगली सैन्य मोठ्या झपाट्यानें पुढे सरसावलें. तें पुढे येतांच चरित्र-