पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०

एकीच्या अभेद्य बंधनांनी एकत्र जखडून गेले होते, व यवनी राज्याच्या ठिकया उडविण्यास प्रत्येकजण अटोकट प्रयत्न करीत होता. महाराष्ट्रीयांत जोपर्यंत एकी होती तोपर्यंत मोठ मोठे मी मी ह्मणणारे तिस्मारखान सुद्धां त्यांना वचकून होते. पण त्या एकीची बेकी झाल्याबरोबर त्यांचा पार विचका उडून गेला, व सध्यां आमच्यांत तिचा अभाव असल्यामुळे अजूनहि होत आहे. ज्यावेळेस सर्व महाराष्ट्रीय एकीनें एकत्र केले जातील, तो खरोखर सुदिन होय !

भोपटकरकृत नव-रत्नांचा -हार-पान १४-१५

 वरील हकिकतीवरून पाहतां, ह्या भयंकर प्रसंगांतील चरित्रनायकाच्या धैर्याची कल्पना वाचकांनीच करावी ! अशा संकटसमयीं चरित्रनायकानें आपणांस उपकृत केलें, त्याचें पारितोषक ह्मणून महाराजांनी त्यांस आणखी पांच हजारी पायदळाची सरदारी देऊन गौरव केला.

 दिवसेंदिवस शिवाजीमहाराजांचा वचक विजापुरासच काय; परंतु मोगलासहि बसला. ह्याचें मुख्य कारण प्रत्येक सरदार किंवा किल्लेदार हे केवळ आपल्या नोकरीच्या पेशानेंच किंवा स्वार्थांकरितां लढत नसून आपण मराठी राज्य- संस्थापक या अंतिम ध्येयामुळे आपला प्राण रणांगणीं जाईपर्यंत शत्रूंस हार जात नसत. म्हणूनच अशा भयंकर परिस्थितींतून मराठ्यांचा उदय झाला.

 ह्याप्रमाणें महाराजांनी आपल्या विश्वासू साथीदारांच्या अतुल पराक्रमानें विजापूरकरांची राजसत्ता निर्जीव केली. तेव्हां त्यांनी निरुपायास्तव महाराजां- बरोबर इ. स. १६६२ त शहाजीराजे यांचे मार्फत तह करविला. त्यामुळे