पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Afzulkhan's camp and had heard him boast that he meant to entrap Shivaji and take him prisoner to Bijapur. This information Vishwasrao at once communicated to his master. When Afzulkhan's euvoy Krishnaji Bhaskar reached Pratapgad Shivaji affected to believe his words and expressed himself as anxious to meet the Khah as the latter was to meet him.”

 History of the Maratha people by C. A. Kincaid and R. B. Parasnis, Page 158.

 “ मध्यंतरी विश्वास नानाजी मुसेखोरेकर म्हणून एक प्रभुजातीचा सर- दार शिवाजीजवळ होता. त्यानें फकीराच्या वेषानें खानाच्या छावणात वारंवार जाऊन तेथील वित्तंबातमी महाराजांस आणून दिली. सतराव्या शतकांत त्यांना जी यशःप्राप्ति झाली, त्याचे कारण हेंच की, त्यावेळेस ब्राह्मण, प्रभु, मराठे, शूद्र इत्यादि अनेक जातीच्या लोकांनी आपण सर्वजण एकाच धर्माचे व एकाच हाडामासांचे आहोत, असा उज्वल भाव आपले ठायीं बाणून घेऊन शिवाजी महाराजांना हिंदुपादशाहीची इमारत उठविण्याच्या कामांत एक दिलाने व एकाग्र चित्ताने मदत केली. त्यावेळेस मराठे वेदोक्ताबद्दल भांडत तंडत बसले नाहीतं. प्रभूनी ब्राह्मणांचा द्वेष केला नाहीं, किंवा ब्राह्मणांनी आपल्या उच्च वर्णाच्या तोन्यांत क्षत्रियांना साह्य करण्यास कांकू केले नाही. सर्व महाराष्ट्रीय