पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मागें सरला, व दगा रे दगा ! म्हणून ओरडला, आणि तरवार उपसून अब हमारी तरवार देखो " असे म्हणून महाराजांवर वार केला. तथापि महाराजांचें अंगांत चिखलत असल्यामुळे, तरवारीचा वार लागला नाहीं. तेव्हां महाराजांनी सफाई करून " तुम पठाण अब हमारी भवानी देखो " असें बोलून आपल्या तरवारीचा उलट वार केला, तो खानाच्या मर्मस्थानीं लागून त्याचा शेवट झाला. वरील गडबड ऐकून, खानाचे जे लोक बाहेर होते, ते धांवत आंत आले. त्यांस तानाजी, जिवबा, चरित्रनायक वगैरेनी गारद केलें. ही गोष्ट इ० स० १६५९ शके १५८१ विकरी नाम संवत्सरे मार्गशिर्ष शु गुरुवार रोजी झाली.

 चरित्रनायकानें फकिराचा वेष धारण करून शत्रूच्या गोटांत जाऊन, तेथील सैन्याच्या हालचाली व त्यांचे बेत काय आहेत, ह्यासंबंधीं गुप्त बातम्या आणिल्या नसत्या तर महाराजांस हा प्रसंग मोठा भयंकर गेला असता, अर्थात खानाचा वध होणेंही अशक्य झालें असतें. " आपल्या लष्करांत सावधगिरी ठेऊन शत्रूंच्या लष्करांत गाफीलपणा ठेवण्यास पण हां विसूच कारण झाला. असे जिजाबाईसाहेब वारंवार ह्मणत असत. "

 चरित्रनायकाच्या वरील कृत्याबद्दल कांहीं ग्रंथकारांनी आपल्या ग्रंथांत आपली मतें व्यक्त केली आहेत तीं:-

 " विश्वासराव नानाजी मुसेखोरेकर म्हणून एक सरदार शिवाजीजवळ होता. त्यानें फकिराच्या वेषानें खानाच्या छावणीत वारंवार जाऊन तेथील खडान खडा बातमी आणून शिवाजीस दिली. त्यावरून शिवाजीनें आपला पुढील बेत ठरविला. "

म.रि. पा. २४४