पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६

 मंडपाशेजारील दरींत जिवबा महाडीक, संभाजी कावजी, हिरोजी फर्जद वगैरे खासगीतील लोक ठेविले. आबाजी रघुनाथ ग्रांस चौक्याच्या बंदोबस्तास ठेविलें. चरित्रनायक मंडपाच्या पहाऱ्यावर होते, याप्रमाणे योग्य बंदोबस्त करून ठेविला.

 अफजूलखानही आपली छावणी वाईहून उठवून, रडतोडीच्या घाटांतून पार मुक्कामी येऊन राहिला होता. उभयतांच्या भेटीचा दिवस जवळ आला. खानानें आपली छावणी हालवीली, तरी चरित्रनायकानीं आपल्या फकिराच्या वेशास फांटा दिला नव्हता. त्यांचा नित्यक्रम चालूच होता. दररोज नवीन नवीन बातमी आणितच होते. त्यामुळे महाराजांस निर्धास्तपणे पुढील कार्याची दिशा आंखण्यांस योग्य संधी मिळत असे, हें वर दिलेच आहे.

 उभयतांच्या भेटीची वेळ ठरली होती. त्याप्रमाणे खान आपल्या लोकांसह छावणीतून बाहेर पडला. तेव्हां पंताजी गोपिनाथानें त्यांस विनंती केली की, आपण इतक्या सरंजामासह गेल्यास, शिवाजी आपल्या भेटीस येणार नाहीं. कारण शिवाजी सडाच येणार आहे. तेव्हां तो आपले लोक तेथेंच ठेवून स्वतः पालखीत बसून निघाला. फक्त त्याने आपल्याबरोबर आपला हुजऱ्या सैय्यद बांडा मात्र घेतला होता. व शिवाजीही फक्त तानाजीसह आला. शिवाजीमंडपांत आल्यानंतर त्या दोघांमध्ये दोन चार कुशल शब्द होऊन, मित्रत्वाचें एकमेकांस आलिंगन देऊं लागले. तोंच खानाने महाराजांस पुढे ओढून आपल्या डाव्या कुशीवर दाबून धरून डोकीवर कट्यारीचा वार केला. परंतु महाराजांच्या डोकीवर शीरस्त्राण असल्यामुळे वार लागला नाहीं. तोंच महाराजानें चलाखीनें आपलें अग काढून घेऊन, डाव्या हातानें वळसा घालून बिचव्याचा वार खानाच्या पोटावर केला त्यामुळे खान