पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४

बळकट धरून यत्न केल्यावांचून सुखप्राप्ति, अथवा राज्यप्राप्ति कर्धीही व्हावयाची नाहीं. सुखाची उत्पत्ति दुःखापासून व दुःखाची सूखापासून आहे, तेव्हां दुःख भोगिल्याशिवाय सुखाचे दिवस दृष्टीस पडावयाचे नाहीत. दुःख, धैर्य, अभिमान, दृढनिश्चय, सदाचरण, कर्तव्यजागृति वगैरे ही मनुष्याच्या ठिकाणच्या गुणांची पारख करण्याची कसोटीच होय. घणाच्या घावांनीही न फुटणारा तोच खरा हिरा. भट्टीत तापवावें तसे अधिक उज्वलित होणारे सुवर्ण बावन्नकशी ठरतें, तद्वत् क्लेशरूप घणाच्या घावांनी भग्न न होणारें, किंवा संकटाग्नीच्या भटींत पडलें असतां जास्त उज्वल होऊन निघणारें तेंच खरें धैर्य व तेच खरे सद्गुण होत. अस्तु !

 चरित्रनायकास अफजुलखानाच्या सैन्यांत व गोटांत प्रवेश करताना अनेक त-हेनें छळ सोसावा लागला. परंतु आपला निश्चय ढळू दिला नाहीं. तेव्हां हा कोणी तरी खरोखरच अवलीया ( फकीर ) आहे. अशी तेथील सर्वाची खातरी झाली. म्हणूनच त्याचा शिरकाव खानाच्या गोटापर्यंत झाला. इतकेच नव्हे तर रात्रीच्या प्रहरी कित्येकांस ह्या फकीराकडून मोठी करमणूक होत असे.

 उपारनर्दिष्ट केल्याप्रमाणे खानाच्या वकिलाने महाराजांबरोबर संगनमत केलें, पुढे उभयतांच्या वकिलांमध्ये असे ठरले की, महाराज खानाच्या भेटीस न जातां त्यांची स्वतंत्रपणें निराळ्याच ठिकाणी भेट करावी, व अशा प्रकारें महाराजांनी शेरास सव्वाशेर या तत्वानें खानाचा सूड घ्यावा. ह्याप्रमाणें उभयतांचें संगनमत होऊन, ते परत खानाकडे गेले. त्यांनी खान खूष होईल. अशाप्रकारें बोलून शिवाजी फार भित्रा असल्यामुळे, आपल्या भेटीस गोटांत यावयास भितो ! परंतु जर आपण त्यांस भेटाल तर त्याच्या भेटण्याची व्यवस्था