पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३

प्रथम दाद लागू दिली नाही. तेव्हां चरित्रनायकानें सांगितलेली हकिकत त्यांस मोठ्या खुबीनें विचारिली. तेव्हां तो फार आश्चर्यचकीत झाला, त्याचे कारण हेंच की, आपणांकडील इत्यंभूत बातमी इकडे कशी कळते ? अर्थात त्यांस खानाचा अंतस्थ हेतु सांगांवा लागला. तेव्हां शिवाजी कृष्णाजी भास्करास बोल- ले कीं, पहा ! "तुह्मीं ब्राह्मण आहात, आझाला ब्राह्मण पूज्य, त्यांची यवनांच्या जाचांतून मुक्तता करावी, हिंदुधर्माची होत असलेली पायमल्ली नष्ट करावी, हा आमचा मुख्य हेतु. त्यांत तुमच्या सारख्याने आम्हांस ह्या कार्यास अवश्य साह्य केले पाहिजे. ” शिवाजीचें हें आवेशाचें व कळकळींचें भाषण कृष्णाजी पंताच्या मर्मस्थांनी भिनले. त्या भाषणाचा परिणाम असा झाला कीं या कामीं, आपणाकडून शक्य ती मदत करण्याचे त्यांनी महाराजांस आश्वासन दिले. खानाच्या वकिलाबरोबर अशाप्रकारें संगनमत करून महाराज आपल्या चिटणीसासह गडावर परत गेले. दुसरे दिवशीं प्रातःकाळी रात्रौ झालेली हकि- गत आपल्या मातोश्रीस सांगितली. त्यावेळी महाराज.नीं, चरित्रनायकाच्या धाडसाची हकिगतही सांगितली: चरित्रनायकांस प्रथम प्रथम खानाच्या छावणीत शिरकाव करून घेतांनां बराच त्रास भोगावा लागला; परंतु आपल्या कर्तव्यापुढे त्यांस त्रासाची पर्वा नव्हती. हीच स्थिती कालचक्राच्या फेऱ्यांत सांपडलेल्यांची आहे. आपत्कालाच्या तडाख्यांत सांपडला नाहीं, असा प्राणी विरळा. मात्र अवनत- दशा प्राप्त झाली असतां, तींतून आपण कधीही पार पडणार नाही, असे समजणें, किंवा निराश होऊन स्वधर्म, नीति व कुलाचार ही विसरून भलत्याच मार्गाचें अवलंबन करणें, हे अगदी चुकीचें आहे. धिमेपणानें यत्न करीत गेलें असतां, काय साध्य होणार नाहीं ? " प्रयत्ने वाळूचे कण रगडितां तेलहि गळें " ! असें म्हटले आहे. निश्चय मात्र ढळूं देतां कामा नये. बीं रुजल्यावांचून जसा अंकूर फुटत नाहीं. तद्वत् कष्ट सोशिल्या वांचून किंवा विपत्कालीं धैर्याची कांस