पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२

सावधच आहे, परंतु विश्वासराव तुह्मांवर प्रथम संकट येण्याचा संभव आहे. फार सावधगिरीने असा, शत्रूचा पराभव करण्यास श्रीतुळजाभवानी समर्थ आहे. मजला साह्य करण्यास तुमच्या सारखे धूर्त व मर्द असतां, अफजुलखा- नाचें तें काय चालणार ? असें ह्मणून चरित्रनायकाचा शिवाजीनें त्याच वेळी योग्य शब्दांत गौरव केला.

 पंताजी गोपिनाथ यांस खानाकडून महाराजांच्या भेटीचा दिवस नक्की ठरविण्याचें जरी कळविलें होतें, तरी त्याचें उत्तर येईपर्यंत थांबण्याचे त्यांस अशक्य झालें होतें. त्यांनी आपल्या वकीलास शिवाजाकडे जाऊन भेटीचा दिवस नक्की ठरवून येण्यास सांगितले. त्याप्रमाणें खानाचा वकील दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी प्रतापगडाखालील फड या गांवी आला. त्यानें आपण आल्याची वर्दी गडावर पाठविली. तेव्हां महाराजांस त्याचे स्वगतार्थ व रहाण्याच्या व्यवस्थेकरितां गडा- वरून मनुष्येंहि पाठविलीं, व महाराज आपली एकांती भेट घेणार आहेत, असेंहि त्यांस कळविलें.

 शिवाजीमहाराज संकटसमयीं श्रीदेवीची प्रार्थना करीत व तिच्या आशिर्वादा- प्रमाणें वर्तन करीत, ह्या मामुली वहिवाटीप्रमाणे ह्या वेळीहि श्रीदेवीचा प्रसाद मिळविला होता. अर्थात आतां ह्या संकटांतून आपण पार पडूं, असा त्यांचा पक्का भरंसा झाला होता.

कृ णाजी भास्कर शिवाजीस भेटण्यास आला होता. हें वर दिलेच आहे. त्याची भेट शिवाजीनें, एकांती घेऊन खानाचा हेतु काय आहे, हे त्यांस विचारिलें, परंतु खानाचा वकील कांही असामान्य नव्हता. त्यांनें शिवाजीस