पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०

मायावी भाषणानें फसून जाणारा शिवाजी इतका कांही दुधखुळा नव्हता, कारण जो मनुष्य आपणांस जिवंत अगर मेलेला धरून आपण्याकरितां भर दरबारांत प्रतिज्ञा ठोकतो, जो हिंदुंच्या देवता विच्छिन्न करण्यास यत्किंचितहि मागें पुढें पहात नाहीं, जो आपणांस पकडण्याकरितां जिकडे तिकडे मोर्चे लावून ठेवितो, त्याच्या मनांत आपल्याविषयी इतके प्रेम असणे, म्हणजे पूर्वेकडील सूर्य पश्चिमे- कडे उगविला पाहिजे. त्याचा हेतु आपणांस युक्तिप्रयुक्तीने बाहेर काढून पकड- ण्याचा असावा, हेच खास ! इतकी महाराजांची सिद्धता होण्यास मुख्य कारण चरित्रनायकच होत. चरित्रनायकानें हा खानाचा हेतू पूर्वीच त्यांस विदित केला होता. कृष्णाजी भास्करानें खानाने सांगितलेला सर्व पाढा महाराजांस सांगितला, त्यावेळी महाराज आनंदी मुद्रा करून थोडे हांसले, व मानभावक- पणानें बोलेल की, खानाचे मजवर हे उपकारच आहेत, त्याजकडून आमचे अहित कधीही होणार नाहीं. असें म्हणुन, त्यांस निरोप देतांना आपला वकील पंताजी गोपिनाथ यांस खानाकडे पाठवून, पुढील कार्याची दिशा आंखण्याचें विदित केले. आपल्या भाषाणामुळे महाराज खूष झाले, असे त्यांच्या हांसण्याचा भावार्थ समजून त्या आनंदांत कृष्णाजी भास्कर निघून गेला; परंतु महाराज हांसलें त्याचा आशय असा होता की, ही सर्व हकीकत तुमच्या पूर्वांच मला कळली, हेच दर्शविलें.

 चरित्रनायक किती धाडसी आहे. हे महाराजांस तोरणा किल्ला घेतल्यापासून हा काळपर्यंत अनेक प्रसंगी कळलेच होते. परंतु अफजुलखानाच्या गोटाचा सक्त पहारा असतानांहि, त्यांतून आपला शिरकाव त्यानें निर्वेध करून घेतला. ह्याबद्दल महाराजांस फारच आश्चर्य वाटले. वास्तविक पहातां कर्तृत्वाचें आश्चर्य कां वाटावें ! कारण जो कर्तृत्वान आहे, अगर खऱ्याची ज्यास कळकळ आहे, त्यास अंगिका- रिलेलें कृत्य करणे, हे त्याचें कर्तव्य कर्मच आहे, असे समजून प्रत्येक सरदारच नव्हे तर प्रत्येक मनुष्यप्राणी हे कृत्य आपलेंच म्हणुन करण्यास सिद्ध होत असें, इतकेंच नव्हे तर, त्यावेळी त्यांनी आपल्या प्राणाचीहि पर्वा केली नाहीं. ह्याची इतिहासच