पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फारच हाल होतील, तेव्हां त्याजबरोबर सलोख्यानें वागून, विश्वासघातानें त्यांस पकडावें, असा विचार करून, वाई येथील कुळकर्णी कृष्णाजी भास्कर ह्मणून होता, त्यांस बोलावून आणिलें, व प्रतागडावर जाऊन शिवाजीस निरोप सांग- ण्यांस सांगितला कीं. “मजला आमच्या सरकारचा सक्त हुकूम आहे, कीं, तुझें पारीपत्य करून कैद करून आणावें, परंतु मी तुझ्या वडीलांचा जुना स्नेही असल्यामुळे, तसें करणें मला इष्ट वाटत नाहीं, तेव्हां स्नेहाच्या दृष्टीनें, त्याच्या मुलाचें अहित न करीतां उपदेशाच्या दोन गोष्टी सांगाव्या, या उद्देशानें कळवीत आहे. तेव्हां तूं मला त्वरीत येऊन भेट, ह्मणजे मी पादशाहाची भेट करून देईन. इतकेंच नव्हे तर बादशहाकडून कांही बक्षीसहि देण्याची शिफारस करीन ! किंबहुना तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी करून देईन.” याप्रसाणे खानाचा निरोप सांगण्या- करितां कृष्णाजी भास्कर दुसऱ्याच दिवशी आला, परंतु खानानें आपल्या वकिलांस वरीलप्रमाणे आपला मनोदय कळविला, तेव्हां त्यांस वाटले की, ह्या मायावी भाष णांस शिवाजी खास भुलेल, आणि आपल्या भेटीस निःसंशय येईल; ह्या आनंदाच्या लहरींत गर्क होऊन, तो आपल्या सरदारांजवळ, मोठ्या मर्दुमकीनें बोलूं लागला की, आमचे जवळ कांही युक्त्या नाहीत काय ? त्या भिकार शिवाजीनें केवळ लुटारूपणा करावा, यांस थोडे आमीष दाखविलें कीं, तो सहज आमच्या म्हणण्यास कबूल होईल, व अशा रीतीनें एकदां तो हाती लागला, म्हणजे त्याचें पारिपत्य करणें तें माझ्या मर्जीप्रमाणे मी करणार ! हे खानाचें दांभिक- पणाचें सर्व भाषण चरित्रनायकानें ऐकून, कृष्णाजी भास्कर प्रतापगडावर येण्या- पूर्वीच ते शिवाजीमहाराजांस सांगितले होते. कांही वेळानें कृष्णजी भास्कर प्रतापगडावर आल्याची वर्दी आली. पुढे कांही वेळांनी महाराजाने त्याची भेट घेतली. त्यावेळी खानानें पढविलेला पाढा त्यानें म्हणुन दाखविला. पण असल्या