पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८

सैन्याचा टिकाव लागणार नाहीं. असेंही त्यास वाटलें. तेव्हां कांहीं तरी युक्ति प्रयुक्तीनें, त्यास उघड्या मैदानांत आणून विश्वासघातानेंच, त्याचा धुव्वा उडवून द्यावा, असा त्यानें बेत केला.

 शिवाजी प्रतापगडावर आल्याबरोबर त्यांनी किल्याचा योग्य बंदोबस्त करण्याकरितां निरनिराळ्या ठिकाणी गेलेल्या आपल्या सर्व सरदारांस बोलावून आणिलें. ते आल्यावर प्रतापगडाचा योग्य बंदोबस्त करून आलेल्या संकटांतून, पार कसें पडतां येईल, ह्या विचारांत ते लागले. खान, वाईस आल्यापासून चरित्रनायक आपल्या सरंजमाचा दिवसा बंदोबस्त ठेवून, रात्रीच्या प्रहरीं फकीराच्या वेशानें खानाच्या गोटांत भिक्षा मागण्यास जाऊंलागले. भिक्षा माग- तानां खानाच्या लष्कराची स्थिती कशी आहे. त्यांचे वेत काय चालले आहेत. ह्याकडे चरित्रनायकाचें सर्व लक्ष वेधलेले असे. खानाच्या छावणीतील लोकांस हा फकिर नसून शत्रूकडील हेर आहे, व तो आपल्या लष्कराची टेहळणी करण्या- करितां येतो, अशी शंका कोणासहि येणे शक्य नव्हतें. इतकी त्याची अजब कृति असे. ह्या बेमालूम कृति मुळेच चरित्रनायकांचा शिरकाव खानाच्या लष्करांतच नव्हे तर, मोठमोठ्या सरदारांच्या गोटांपर्यंत होऊन, कित्येकांस तर ह्या फकीरापासून रात्रौ मोठी करमणूक होत असे. ह्याप्रमाणे चरित्रनायक खानाकडील दररोज निरनिराळ्या बातम्या आणून शिव जो अगर चिटणीसास देत असत, त्यामुळे शिवाजस कोणती व्यवस्था व ती कशाप्रकारें करावी, ठरविण्यास अवसर मिळत असे.

 मागे दिल्याप्रमाणे खानास मोठा विचार पडला होता, तो असा की शिवाजीनें जर ह्या डोंगराळ प्रदेशांत, लुटालूट अगर दंगा धोपा केला, तर आपल्या सैन्याचें