पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणजे काय ? डोंगरांतील उंदीर ! त्यांस मी जिवंत अगर मेलेला कसा तरी पकडून, ह्या तक्तापाशी आणितो ! अशी त्यानें भरदरबारांत घोर प्रतिज्ञा केली.

 अफजुलखान हा त्यावेळी विजापूरच्या तक्तावर असलेल्या, आल्ली आदिलशहाचा मामा असून विजापूरच्या दरबारांत शहाजीराजे, रगदुल्लाखान इत्यादिकांच्या विरुद्ध बाजूच्या लोकांत तो प्रमुख व पुढारी होता. रणदुल्लाखानाच्या विरुद्ध व त्याचा कट्टा वैरी असल्यामुळे, रणदुल्लाखानाच्या बाजूचा शहाजी, अर्थात त्या- चा हा वैरी होता. आणि वैन्याच्या मुलाचा कांटा काढून टाकावा असे त्यांस वाटत असे. तद्वत तो स्वभावानें क्रूर, घातकी पातळयंत्री व अतिशय गर्विष्ठ असा होता- सन १६५३ च्या सुमारास तो कर्नाटकांत असतांना, शिवाजीचा वडील भाऊ संभाजीराजे यास दग्यानें, मारणार तो हाच ! त्याचें ते गर्वाचें व वीररस प्रचुर भाषण आणि केलेली ती घनघोर प्रतिज्ञा ऐकून, बेगामसाहेबास तर अत्या- नंद झाला, व ताबडतोब तिनें त्याची त्या कामावर योजना केली. अफजुलखानानें भरदरबारांत केलेली प्रतिज्ञा, आपला गुरु " उस्तादास " यांस सांगीतली. त्याच वेळी त्याच्या गुरुनें त्यांस सांगीतले की, शिवाजी अवतारी पुरुष आहे. तुझी प्रतिज्ञा शेवटांस जाणार नाहीं, इतकेच नव्हे, तर, तुझ्या प्राणांस अपाय होण्याचाही संभव आहे, करितां यापासून परावृक्त हो! आपल्या गुरुनें आपणांस अशा प्रकारें निरुत्साह केलें, त्याबद्दल त्यास अत्यंत वाईट वाटले, त्याचप्रमाणे त्याने आपल्या जनानखान्यांतील स्त्रियांस आपण केलेली प्रतिज्ञा सांगितली, तेव्हां त्याच्या स्त्रियानींहि त्यांस त्याच प्रमाणे विनवणी केली, त्यामुळे त्यांस अनिवार संताप आला, त्या संतापाच्या भरांत त्याने आपल्या एकुणपन्नास स्त्रियांचा क्रूरपणानें शिरच्छेद केला. त्याच धुंदीत तो सन १६५९ च्या सप्टेंबर महिन्यांत निवडक बारा हजार फौज, हत्ती, घोडे वगैरे घेऊन शिवाजीला