पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ४ था.
पराक्रम व शेवट

मागील भागांत अफजुलखानानें विजापूर दरबारांत विनंती केली हें दर्शविलेंच आहे. यावेळी जवानमर्द मराठे व मावळे वीरांनी, आपल्या शुद्ध व सतेज बुद्धीनें, आपला स्वराज्याचा रम्य रोपा मोठ्या झपाट्यानें पलवयुक्त केला. चंद्रराव मोरे, बाजीघोरपडे. बांदलदेशमुख इत्यादिकांचा कांटा काढून टाकिल्यामुळे, तो रोपा मोठ्या जोमाने वाढून लागला होता. व लौकरच त्याच्या रम्य व शीतळ छायेखाली सुखानें कालक्रमणा करण्याची सुसंधि लाघेल, अशी मावळे वीरांनां, आशा वाटू लागली होती. इतक्यांत त्या जोमानें फोफावणाऱ्या स्वातंत्र्याच्या रोपाला, खच्ची करण्याची इच्छा मराठ्यांच्या शत्रूच्या अंतकरणांत उद्भवली. तो रोप अशाच जोमानें व झपाट्याने वाढत गेल्यास, विजापूरच्या राज्याची इमारत पार जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाहीं, अशी विजापूर दरबाराला मोठी काळजी लागून राहिली होती. हैं मागील भागांत दिलेंच आहे. ह्या संकटसमयीं अफजुलखानाची विनंती जणूंकाय यमदूतासच प्रतिबंध करणाऱ्या प्रमाणे वाटली. त्यांत आश्चर्य तें काय ! त्यावेळी बेगमसाहेबाची तर पांचावरधारण बसली होती, तिनें अफजुलखानास त्वरीस बोलाविले. त्याच्या सन्मानार्थ तिनें मोठा दरबार भरविला. त्या दरबारांत बेगमसाहेबांची, ती केविलवाणी स्थिती पाहून, व त्यांनी ती काकुळतीने केलेली विनंती, ऐकून जमलेल्या प्रत्येक सरदारांची अतःकरणे, स्वामीभक्तीन द्रवून गेली. त्यावेळीं अफजुलखान पुढे होऊन मोठ्या- गर्वोक्तीनें व वीररसप्रचुर भाषण करून बोलला की, माझ्यापुढे शिवाजी