पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३

ह्याचा निर्णय लागेना. कारण अदिलशाही दारबारांतील एकहि सरदार शिवा- जीचें पारिपत्य करण्यास धजेना. यावरून पहातां शिवाजीच्या पराक्रमाची जाणीव त्यांम पूर्ण अवगत होती, हें खास. कारण या वेळी मराठ्यांच सर्व प्रयत्न विजापूरकरांचा नायनाट करण्याकडे होते. त्यास नामशेष केल्याशिवाय स्वरा ज्याचा आणि स्वधर्म स्थापनेचा पाया मजबूत होणार नाहीं. हे ते पक्के जाणून होते. व ह्याच भावनेनें अनेक जवानमर्द वार आपल्या शुद्ध व सतेज रक्तानें पराक्रम गाजवीत होते. ह्याच सुमारास मरठ्यांचा मोर्चा वाइ प्रांतातील मुलूख काबीज करण्याकडे वळला होता. त्या वेळी ह्या प्रांतांवर अफजूलखान नामें विजापूरकरांचा सरदार होता. त्याचेंकडून कागाळ्यांची आरडाओरड अदिलशाही दरबारी फार झाली. त्याचें मुख्य कारण असे होते की, वाई मिरज, जमखिंडी वगैरे प्रांतांत खुद्द अफजुलखानाची जहागिरी बरीच होती, आणि या प्रांतांत मराठ्यांचा उपद्रव होत असल्यामुळे, अफजुलखानाचें प्रत्यक्ष व्यक्तिशः नुकसान फार झाले त्याखेरीज ह्या प्रांतातले किल्लेदार, देशमुख देशपांडे वगैरे शिवाजीनें आपल्या बाजूस वळविले. त्यामुळे त्याज कडील वसूल अफजूलखानास मिळ- ण्याचा बंद झाला. अशा अनेक कारणांवरूर अफजूलखान शिवाजीवर फारच संतापला होता; परंतु त्याची शिवाजी बरोबर दोन हात करण्याची सिद्धता नव्हती हैं खास; तेव्हां त्यानीं विजापूर दरबारी विनवणी केली की, मला जर दरबारांतून मदत होईल, तर मी शिवाजीचें पारिपत्य करीन.

 वर दिल्याप्रमाणें अफजुलखानासारख्याची केविलवाणी स्थिती कां बरें व्हावी ? तसेंच आज दीड शतक अदिलशाहीचा पूर्ण अंमल झाला असतां. तिच्या दर- बारी मंडळीने किंवा तेथील महापराक्रमों सरदारानी भयभीत कां व्हावें !! ह्याचा क्षणभर विचार केला असतां, त्यावेळी तेथें स्वाभिमानशून्य व देश हितविघातक अशांचा जमाव होता. हे सिद्ध होतें. अशी परिस्थिती असल्यामुळे त्यांस यशप्राति
·