पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२

शहाजीस दग्यानें पकडून विजापूरास नेले. तेथें त्यांस अदिलशहानें कैद केले. ते सन १६४९ पासून १६५३ पर्यंत कैदेत होते. त्यांची कैदेतून सुटका शिवाजीनें मोगलामार्फत करविली. शहाजीराजे कैदेत असे पर्यंत शिवाजीनें विजापूरकरांच्या मुलुखांत उपद्रव दिला नव्हता, परंतु वडिलांची सुटका झाल्या नंतर त्यांनी विजापूरकरांच्या प्रांती हल्ले चढविण्याचें निशाण उभारिलें.

 ह्यावेळी शिवाजीस विजापुरच्या दोन सरदारांपासून फार आडथळे होत असत, तेः—एक मोरे व दुसरा बांदलदेशमुख. हे दोघे सरदार जरी विजापुरकरांचें होते, तरी ते स्वतंत्रच वागत असत. ह्या दोघांस शिवाजीनें आपले अंकित व्हावे, म्हणून सामोपचारानें कळविले होते, परंतु तं त्यांनी मान्य केलें नाहीं, तेव्हां त्याजवर हल्ले चढवून त्यांचा सर्व मुलूख आपल्या ताब्यांत घेतला. हे दोन्ही प्रांत शिवाजीच्या ताब्यांत आल्यामुळे बहुतेक मावळ व घांटमाथा ताब्यांत आला इतकच नव्हे तर, मराठी राज्याची सीमा इतकी मोठी झाली की ती विजापूरकरांच्या सरहद्दीस जाऊन भिडली. अर्थात मध्ये शत्रूपासून अडथळा होणें राहिला नाही. त्याच सुमारास विजापुरचा अहमदशहा अदिलशहा सुमारें वर्षभर अजारी होता तो ता. १५ नोव्हेंबर सन १६५६ त मरण पावला. तेव्हां त्याचा अज्ञान मुलगा अल्लीअदिलशहा तक्तावर बसला. ह्या आवर्धीत शिवाजीनें विजापुरकरांचा बराच मुलूख काबीज केला. त्यामुळे दरबारच्या मंडळीस आपल्या स्वातंत्र्यास व इभ्रतीस धक्का बसेल, अशी दहशत बसली. तेव्हां शिवाजीचें पारिपय कसे करावें, हा विचार त्यांस पडला. दरबारी मोठी कार- स्थानें चालू झाली. कारण शिवाजीच्या राज्याची मर्यादा फार वाढली. हें वर दर्शविलंच आहे. त्याच प्रमाणे त्यांनी फौजफाटहि ज्यास्त वाढविली व अनेक पराक्रमी सरदारही संग्रही केले. ह्याची जाणवि त्यांस झालीच होती. अर्थात शिवाजीचा बंदोबस्त ह्याच वेळी केला नाहीं, तर ह्या पुढे आपल्या राज्यासही धोका येईल अशी त्याची खात्री झाली; परंतु शिवाजींचा बंदोबस्त कसा करावा
.