पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ह्यावेळी शहाजीराजे कर्नाटकांत विजापुरकरांचे तर्फे जरी होते, तरी तेथील व्यवस्था ते स्वतंत्रपणानच करीत असत. त्यावरून त्यांची अपाल्या मुलांस ह्या कृत्यास मदत आहे, असे कित्येक दरबारच्या मंडळीने सांगितल्यावरून अदिल- शहास, शहाजीराजे यांचा फार संताप येऊन त्यांनी एक धमकीचें पत्र पाठ- विलें, त्यांत स्पष्ट लिहीले होते की, “आमचा मुलूख काबीज करण्यास तुझीं आपल्या मुलांस आंतून मदत करितां, असे आम्हांस खात्रीने कळले आहे. तरी त्या गोष्टीचा नीट विचार करून आपल्या मुलाचा बंदोबस्त करवा, नाहींतर आह्मी तुमचें व तुमच्या मुलाचें पारिपत्य करूं. " ह्या पत्राचा जबाब शहाजीराजे यांनी अदिलशहास पाठविला. त्यांत त्यांनी स्पष्ट दर्शविलं की, माझ्या मुलाच्या, ह्या कृत्याशी माझा बिलकूल संबंध नाहीं. इतकेच नव्हे, तर, मुलगा माझें मुळींच ऐकत नाहीं, करितां खावंदानेंच त्याचा बंदोबस्त करावा. शहाजीनें अदिलश- हास उत्तर पाठविलें, त्याचवेळी दादोजी कोंडदेवास आपल्या मुलाचा बंदोबस्त करण्याकरितां पत्र लिहिलें, दादोजीनें शिवाजीची ह्या कृत्याबद्दल, कानउघडणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो व्यर्थ गेला. असें कांही बखरीत लिहिले आहे. परंतु त्यांत कांही तथ्य नसावेसे वाटतें. पुढे दादोजी अजारी पडून सन १६४७ त मरण पावला.

 वर निर्देष्टिल्याप्रमाणें अदिलशहाला शहाजीचे म्हणणे अमान्य झाले. हें पुढील त्याच्या कृत्यावरून सिद्ध होतें. शिवाजीस, त्याच्या बापाची मदत आहे. ह्मणूनच त्यानें ही पुंडाई चालविली आहे हाच त्याचा ग्रह कायम झाला. अर्थात शहाजीचा बंदोबस्त केल्यावांचून शिवाजीची पुंडाई थांबणार नाहीं. असा ग्रह कायम ठेवून अदिलशाहानें आपला कर्नाटकांतील सरदार बाजी घोरपडे होता. त्यास शहाजीस पकडण्याबद्दल गुप्त हुकूम पाठविला. त्याप्रमाणे त्यांनी