पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०

किरणापेक्षां प्रभातकालचें आरक्त व बालकिरण मनांत ज्यास्त आनंद, उल्हास व उमेद उत्पन्न करितात, त्याचप्रमाणे किल्ला काबीज करून स्वराज्याचें तोरण बांधिलें, तेव्हांपासून त्यांस पुढील प्रयत्नास उत्तेजन मिळाले. त्यांच्या राजका रणांत अनेक जवानमर्द मराठे वीर आपल्या शुद्ध व सतेज बुद्धीनें येऊन दाखल होऊं लागले. ह्यावेळी विजापूरदरबारी स्वराज हितचिंतक व मुत्सद्दी यांचा बराच अभाव असून स्वार्थी व कमकुवतांचें कूपमंडळ झाले होते. त्यामुळे ह्या प्रांताचा योग्य बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्षच होतें. वास्तविक पहातां हा प्रांत मोगलांचा होता. अदिलशहाकडून त्याचा बंदोबस्त झाला नाहीं, तरी तो मोगलानें करणें वाजवी होते. परंतु मोगलांनी आपल्या राजधानीपासून अती लांब व अवाढव्य मुलूख काबीज केला असल्यामुळे, त्यांस त्याचा योग्य बंदोवस्त करणे अशक्य झाले होते. याचे कारण असे की, सन १६४४ त शहाजहानानें औरंगजेबास • दक्षिणच्या सुभ्यावरून काढून गुजराथच्या सुभ्यावर पाठविले. त्यानंतर अनु क्रमे खानडौरान यांस एक वर्ष, जयसिंग दोन वर्षे, शहाजवानखान यांस थोडे दिवस, पुढें मुरादबक्ष, व इ. स. १६४९ ते १६५२ पर्यंत शाहिस्तेखान, नंतर औरंगजेब, याप्रमाणे मोगलांचे दक्षिणेतील अनेक सुभेदार झाले, त्यांस आपल्या डामडौलाखेरीज, दक्षिणच्या सुभ्याचा बंदोबस्त करितां आला नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे, शिवाजीस मोगलापासून या अवधीत मुळींच त्रास झाला नाहीं, व त्यांनीहि मोगलांच्या मुलुखांत उपद्रव देण्याचा प्रयत्न केला नाहीं; परंतु मोगलांच कित्येक किल्लेदार, बळकावून बसलेले किल्ले, आपण होऊन शिवाजीचे स्वाधीन करून, स्वतः त्यांचें अधिपत्य पत्करूं लागले. त्या मुळे थोडक्याच अवधीत शिवाजीच्या मुलुखाचा विस्तार फारच वाढला. अर्थात विजापुरकरांचा वसूल दक्षिणेंतून जाण्याचा दिवसेंदिवस कमीच होत चालला. त्यामुळे विजापुरदरबारी फारच गडबड उडाली.