पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ची पुनः स्थापना झाल्याशिवाय आपल्या गुणांचें चीज होणार नाहीं. अशा विचारांनी त्यांच्या मनांत काहूर उसळून गेलें होतें. त्यावेळी परतंत्राचे, इतके भयंकर व अनर्थक परिणाम होत असल्यामुळेच परतंत्रतेच्या दाबांत सडत असलेल्या लोकांनी तिच्या कचाटांतून सुटून जाण्यासाठी मृत्यूला देखील आनं- दानें व उल्हासानें कवटाळण्यांस सिद्ध व्हावें, किंवा स्वातंत्र्य संपादनार्थ स्वतः च्या जीवितावरही पाणी सोडण्यास उद्युक्त व्हावें, त्यांत नवल तें काय ? पारतंत्र्यांचे पाश झुगारून देऊन स्वतःस स्वातंत्र्याची जोड करून घेण्याकरितां निरनिराळ्या लोकांनी केलेल्या दीर्घ, घनघोर व तुंबळ प्रयत्नांचे दाखले जगाच्या इतिहासांत अनेक नमूद आहेत, त्याचप्रमाणे सतराव्या शतकांत मावळ्यांनी शिवाजीबरोबर चालू केलेले राजकारण हें त्यापैकीच एक आहे. " ( केसरी ता. २८-४-९६)

 वर नमूद केल्याप्रमाणें शिवाजीबरोबर राजकारणांत अनेक तरुण दाखल झाले. त्यांचा जोम वाहूं लागला. यावेळी पुण्याच्या सुभ्याची व्यवस्था सुभेदार दादोजी कोंडदेव हा पहात असे. सुभेदार ह्या परगण्याचा वसूल नियमीत खर्चा- पुरता ठेवून बाकी सर्व शहाजीराजे यांजकडे पोहोचता करीत असे. त्यामुळे शिवाजीस ह्यावेळी त्यांच्या राजकारणाच्या वाढत्या खर्चास लागणाच्या द्रव्याची मदत चरित्रनायक वेळोवेळी करीत असे. अशा अनेक प्रकारें शिवाजीस साह्य मिळाल्यामुळे थोडक्याच अवधीत विजापुरकरांच्या तोरणा किल्यास मरा- ठ्यांचें तोरण बांधलें गेलं.

 हा काळ ह्मणजे मराठ्यांच्या स्वातंत्र्यरवीचा उषःकाळ ! अर्थात प्रभात- काळच्या कोवळ्या व सुवर्णमय किरणांप्रमाणे मनाची उल्हासित वृत्ति करणारा असा होता. ज्याप्रमाणे दिनमणीच्या माध्यान्हकाळच्या तेजोमय