पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उघड होतें.परंतु त्यावेळी महाराष्ट्रांतील हिंदुंची परिस्थिती बरीच अधोगतीस गेलेली होती. त्यांस स्वतःच्या परवशतेची चांगलीच जाणीव होऊन त्यांच्यांत स्वातंत्र्याची प्रेरणा उत्तम झालेली होती. त्यावेळी स्वदेशाकरितां, स्वधर्माकरितां व स्वातंत्र्याकरितां, आपला देह अर्पण करण्याकरितां, अनेक मावळ्यांची मनें स्वयंस्फूर्तीने तयार होतीं. त्या वेळीं मी किंवा माझें कुटूंब एवढेच माझ्या कर्तव्याचें क्षेत्र नसून माझा देश, त्या देशाच्या प्रगतीच्या मार्गात आडव्या येणाऱ्या अडचणींचा नाश करणें हें माझें आद्य व परम कर्तव्य आहे. अशी त्यावेळी मावळ्यांचीं वृति संचारून गेली होती. त्याप्रमाणें ते कृति करूं लागले. ह्या गोष्टींची अद्याप प्रत्यंतरें पहावयास मिळतात. ह्या गोष्टी पौराणिक नाहींत.

 "परंतु मावळ्यांच्या साह्यानें श्रीशिवाजीमहारजांनी मराठी राज्याची स्थापना केली ती मात्र आतां पौराणिक होऊं शकत नाहीं. " अशा जोमानें जे मावळे आपल्या देशाला पारतंत्र्यांतून काढून स्वातंत्रेच्या व स्वधर्माच्या उदात्त हेतुनें प्रेरित झालेले ते विजापूरकरांच्या धाकदपटशास कितीसें महत्व देणार ? असो. ह्यावेळी विजापूरचा बादशहा अहमदशहा अदिलशहा होता. मुसलमा- नांच्या धर्मच्छाळामुळे सर्व प्रजा संत्रस्त झाली होती. हिंदु राजांची भंगलेली सिंहासने व उध्वस्त झालेलीं देवालयें, यवनी राज्याच्या जुलमाची व बेफा- मपणाची साक्ष पटवीत होतीं. मुसलमान सरदारांनी जबरदस्तीने आपल्या जनानखान्यांत ओढून नेलेल्या हिंदुस्त्रिया, त्यांचें पातिव्रत्य भंग झालेले पाहून, त्या सैतानांची आपल्या क्रोधानीत राखरांगोळी करून टाकण्याविषयीं कारस्था- नें, कित्येक स्वाभिमानी हिंदु सरदारांकडून चालू झालेली होतीं, व हिंदु राज्या-