पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७

 वरील पत्र दादजीस आल्यानंतर सुमारें एक महिन्यानें म्हणजे शके १५६७ जेष्ठ वद्य २ चें पत्र विजापुरकरांकडून आले, ते ( रा. खं. १५ पृ. २६९ ) 'खुदावंत शाह गाजी हुकमत पन्हा याचे हुकूमानें मेहेरबां वजीराचा हाकाम तुमचे नांवे आला त्यांत मजमून अज रख्तखाने सीवाजी राजे यासि पुंडावास तुम्ही मिळताव होऊन रोहिरेश्वर पहाडी तुमचे खोरीत हजार बारासे जमाव तुम्ही लोकी केला ये बाब राजे म||रनिल्हे याणी तुम्हांस खत प ॥ त्यात इमानभाग जाल्यांचा फिसाती मतलप छ २९ सफर कलमी केला आहे हे खबर बांदल देशमुख व खोपडे व जेघे देशमुखी ठाणे सिरवली जाहीर केली हे कळून फरारी जालास हरदु सेरीची विल यत वैरण जाली मोकदमे हाली हुजूरचे मेहरबानगी वरून कौलनामा फरमाविला असे तरी तुम्ही रयात व पटवारी व बाजे वतनदार याजला कचेबचेनशी आपले मकानी हरदु तापियास येऊन हजर होणे आणि दो हि खोरीची विलायतची संचणी आबादानी करून दिवाण देणे व तुमची जमिदारी हककानु इनामति इसाफतिसी कह बमोजीब येणे दरबाब हरएक मतलब तकसीर केली ती तुम्हास मुबाहक यांचे हुकुमावरून जाली असे दरबाब हरगीज दिवाणां- तून इजा होणार नाहीं " याप्रमाणें विजापूरच्या दरबारांतून दादजीने शिवाजीच्या राजकारणांतून परावृत्त व्हावे म्हणून मोठ्या गौरवाचें तर खरेंच परंतु मुत्सगिरीचे पत्र आले होतें यांत शंकाच नाही.  वरील पत्र दादजी नरस प्रभुला जितक्या मुत्साईरीचें आले, त्याच्या उलट दादजीच्या वडिलांस विजापूरच्या दरबारांतून आलें होतें. कारण नरसी- बावा हे विजापूरकरांचे नोकर होते. अर्थात त्यांस विजापूरकरांनी धाक दपटशा देऊन मुलांस शिवाजीच्या राजकारणांतून परावृत करावें, म्हणून ते धमकीचें पत्र आले असावें, हें शिवाजीनें दादजीस लिहिलेल्या पत्रावरून