पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५

तरूण वीर स्वातंत्र्याकरितां स्वयंस्फूर्तीने त्यांच्या राजकरणांत येऊन मिळू लागले.

 ह्या वेळी चरित्रनायक विजपुरकरातर्फे मावळ खोऱ्याचे बंदोबस्ताकरितां मावळे व कोकणें मिळून पांचशे लोकांच्या पथकासह होते, हें मागें दर्शाविलेंच आहे. त्यांस शिवाजीची स्वराज्य स्थापण्याची चालू झालेली मोहीम कळतांच सन १६४५ त त्यांनी परतंत्र्याचे पाश झुगारून देऊन ह्या राजकारणांत ते आपल्या परिवारासह येऊन मिळाले. इतक्या परिवारासह चरित्रनायक स्वयंस्फूर्तीने येऊन मिळाले, याबद्दल शिवाजीमहाराजांस अत्यंत आनंद होणें स्वाभाविकच आहे. व लवकरच आपल्याला स्वातंत्र्याची कालक्रमणा करण्याची सुसंधी लाघेल अशी त्यांस आशा वाटू लागली. त्यावेळी चरित्रनायकाचा शिवाजीनें योग्य सन्मान करून, आपल्या राजकारणांत त्यांस घेतलें. चरित्र- नायक हे विजापूरकरांतर्फे मावळ खोन्याच्या संरक्षणार्थ होते, हें वर दिलेंच आहे. त्यामुळे त्यांस तेथील डोंगरांतील चांगलीच माहिती होती, तेव्हां त्यांनी प्रथम जे कार्य पत्करिलें, तें डोंगरी किल्ल्यांच्या चोरवाटांची पहाणी करणें, व किल्यांतील अधिकाऱ्यांस अनुकूल करून घेणे. हें होय ! जे थोर पुरुष असतात ते अनेक गुणानें प्रेरित असतात, हाणूनच ते आपल्या प्रखर तेजानें दुसन्यांस दिप- वितात. त्याचप्रमाणे चरिनायकाचें अंगी जे अनेक गुण होते. त्यांत मोठा मह- त्वाचा गुण होता तो हा की, मुत्सद्दी पेंच लढवून शत्रूस जेरीस कसा आणावा, व . आपले इष्ट कार्य साध्य कसें करून घ्यावे. ह्या त्यांच्या विशिष्ट गुणामुळे त्यांस आपल्या प्रांतांतील अनेकांस आपले सहकारी करितां आलें. ह्या त्यांच्या विशिष्ट गुणामुळे महाराजांची थोडक्याच अवधीत बहाल मर्जी बसून त्यांच्या अनेक शौर्याच्या व मुत्सद्दीपणाच्या कृत्यामुळे त्याजवर पूर्ण विश्वास बसला; ह्मणूनच शिवाजीने आपल्या खाजगी मंडळीत त्यांची नेमणूक केली, हें पुढील माहिती- बरून वाचकांच्या ध्यानांन येईल.
,