पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होता. सुमारे दोन वर्षे शहाजीराजे विजापुरास राहिले. नंतर त्यांस कर्नाटकांत पाळेगारांच्या बंदोबस्ताकरितां जावें लागल्यामुळे, जिजाबाई व शिवाजी यांस आपल्या जहागिरीवर पुण्यास पाठविलें. शहाजीराजे सन १६४० त परत विजापुरास आले. त्यावेळी हीं मातापुत्र पुन्हां विजापुरास गेली. तेथून ती परत सन १६४३ च्या सुमाराम आली.

 मोंगलाबरोबर अदिलशहाचा सन १६३६ त तह झाला. त्यावेळी मावळप्रांत अदिलशहाच्या ताब्यांत गेला. तेव्हां तेथील देशमुख देशपांडे, अदिलशहाचें अंकित झाले. त्यांस त्यांच्या मुलखाच्या बंदोबस्ताकरितां अदिलशहाकडून नेम- णूकाहि मिळाल्या, तत्रापि हे देशमुख देशपांडे आपल्या मुलखाची व्यवस्था स्वतं- त्रपणेंच करूं लागले. ह्यावेळी चरित्रनायकाचे पदरीं कोंकणें व मावळे मिळून पांचशे लोकांचे सैन्य होते. त्यांच्या खर्चाकरितां अदिलशहाकडून कांहीं मुलूखही मिळाला होता. असे असतांहि चरित्रनायक स्वधर्म संरक्षणार्थ व स्वराज्य स्थाप- ण्याकरितां शिवाजी महाराजांच्या राजकारणांत स्वयंस्फूर्तीने येऊन मिळाले. त्याची हकीगत पुढील भागांत देण्यांत येईल.