पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नसता तर मराठेशाही तेव्हांच स्थापन झाली असती. परंतु हें महत्कार्य त्यावेळी त्याचेकडून घडलें गेलें नाहीं, तरी त्याचा लाभ त्यांच्या महात्रतापी पुत्रांस मिळाला. हें निराळें सांगावयास नकोच.

 चरित्रनायकाच्या जन्मापासून ह्या महाराष्ट्रांत अनेक क्रांत्या घडून आल्या. त्यामुळे त्यांस त्यांचे अल्प वयापासून लढाई म्हणजे काय, शत्रूवर हल्ले कसे चढवावे, गनिमीकावे कसे लढवावे, शत्रूस जेरीस कसा आणावा, ह्यांचें योग्य ज्ञान त्यांचे वडील मंडळीकडून मिळाले होतें. अर्थात हा काळ झटला म्हणजे मारूं की मरूं. हाच प्रतिध्वनी होत असे. शत्रस पाठ दाखवून परत येत असे, त्याची अवहेलना होत असे, त्यामुळे ते आपल्या प्राणाची पर्वा केव्हाही करीत नसत, म्हणून त्यांच्या कीर्तिध्वजा इतिहासांत चिरंतन आहेत.

 शहाजीराजे यांचे सर्व प्रयत्न निर्फळ झाल्यानंतर निरुपायास्तव त्यांस विजापुराकडे नोकरीत जावें लागले. ते. इ. स. १६३६ त विजापुरास गेले त्यावेळी जिजाबाईसाहेब व शिवाजीमहाराज यासहि बरोबर घेऊन गेले. शहाजीराजे यांनी विजापुराकडे नोकरीस राहण्यांचें कबूल केले, त्यावेळी त्यांची पुणे प्रांताची जहागिरी, जी मोगलाबरोबर झालेल्या तहांत विजापुरकराकडे गेली होती, ती त्यानें शहाजीराजे यांस परत दिली. त्या जहागिरीची व्यवस्था पहाण्याकरितां आपले विश्वासांतील दोन इसम ठेविले, ते एक दादोजी कोंडदेव यांस सुभेदार नेमिलें, दुसरा अनंतप्रभु फणसे व जहागिरीच्या बंदोबस्ताक- रितां एक हजार सैन्य ठेविलें. त्याजवर सैय्यद बांडा हा मुख्य होता. अनंत- प्रभु फणसे हा शहाजीराजे यांचे पदरों उत्तम हिशेब लिहिणारा