पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणे कोंकण प्रांती जंजिऱ्याचा सिद्दी प्रबळ होऊन लुटालूट करूं लागला होता. ह्यामुळे ह्या मावळ प्रांतावर वारंवार शत्रूपासून होणाऱ्या स्वायांचा बंदोबस्त करण्यास हे मावळे स्वतः सिद्ध असत. ह्यावेळीं चरित्रनायकांचे वडील मालोजी राजे यांचे पथकांत मावळांतील जहांगिरीच्या बंदोबस्ताकरितां होते. पुढे ते शहाजीराजे यांचे पथकांत होते.

 इ. स. १६२१ ते १६२६ पर्यंत मालकंबर व शहाजीराजे या उभयतांनीं आपल्या अतुल पराक्रमानें व बुद्धी चातुर्यानें निजामशाहीचें संरक्षण केले. त्यावेळी मावळांतील देशपांडे यांनी मोंगलाबरोबर अनेक लढाया मारल्यामुळें निजामशाहींतून त्यांस वंशपरंपरें वतनें मिळालेली आहेत. खुद्द औरंगजेब दक्षिण सुभ्यावर असतांना, पौडखोरें व मोसेखोरें येथील देशपांडे यांनी निकरानें हल्ले- करून त्यांस नामोहरम केले होते. त्या संच्या पराक्रमाचें पारितोषक ह्मणून कित्ये- कांस देस ईपणाचे हक्क मिळाल्याबद्दल मलिकंबरांच्या वेळच्या सनदा अद्याप असल्याचे कळतें. ह्यावरून पहातां चरित्रनायकांच्या पूर्वजांनी अनेक प्रसंगी लढाया मारून, आपला पराक्रम गाजविला होता. सन १६२६ त मलिकंबर मरण पावला, तेव्हां एकट्या शहाजीराजे यांनी काही काळ निजामशा- हीचे संरक्षण केलें, तेणेंकरून त्यांची कीर्ती ह्या महाराष्ट्रांत अजरामर राहिली. परंतु पुढे त्यांच्या दुर्दैवाने त्यांस त्यावेळी यश आले नाहीं. त्यामुळे त्यांनी थोडक्याच दिवसांत निजामशाहीचा त्याग करून परिंडाच्या किल्ल्यांत राहून स्वातंत्र्याची मोहीम उभारली. त्यावेळी त्यांस विशेषतः ह्या देशरांड्याचाच पाठींबा होता. त्यावेळी मोंगलासारखा प्रबळ शत्रू त्याचें पारिपत्यास
,