पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बुडविण्याची जणूकाय प्रतिज्ञाच असल्यामुळे, तेथील स्थिती फारच शोचनीय झाली होती. कोणत्यावेळी हल्ला येईल, लूट होईल, बलात्कार होतील, अगर घरेंदारें उध्वस्त होतील याचा भरंवसा नव्हता. मोगलाखेरीज या मावळ प्रांता- वर जांजियाच्या शिद्दीनें लुटण्याचा सपाटा चालू केला होता. अशा स्थितीत ह्या डोंगराळ प्रांतांत तेथील देशमुख, देशपांडे यांनीच स्वपराक्रमानें आपले संर- क्षण केलें. अशी परिस्थिति असल्यामुळे चरित्रनायकांस लहानपणापासून वडील मंडळीच्या शौर्याच्या व पराक्रमाच्या गोष्टी ऐकिण्यांत व पहाण्यांत येत असत.

 चांदबिबीच्या कारकिर्दीत निजामशाहीच्या प्रजेस बऱ्याच शांततेनें नांदावयास मिळाले. त्यावेळी चांदबिबीसहि ह्या मावळ्यांनी बरींच मदत केली होती. तिच्या पश्चात पुन्हा निजामशाहीत धामधूम सुरू झाली; परंतु थोडक्याच अवधींत निजामशाहीचे हितकर्ते मलिकंबर, लुखजी जाधव व मालोजीराजे भोसले, ह्यांनी आपल्या पराक्रमानें, बुद्धीचातुर्यानें व संगनमतानें मोगलापासून सन १६२० पर्यंत निजामशाहीचें रक्षण केलें. सन १६१९ त मालोजीराजे भोसले मरण पावले. त्यांचा सर्व अधिकार त्यांचा मुलगा शहाजीराजे यांस मिळाला. त्यावेळी निजामशाहीकडून मालोजीराजे याच्या फौजेच्या खर्चाकरितां पुणा, नासीक, अहमदनगर व खानदेश ह्या प्रांतांतील मुलूख होता. त्यांत पुणे प्रांतां. तील मुलखाची जहागिरी मावळांतील असल्यामुळे भोसले घराण्याचा व ह्या देश- पांडे मंडळीचा बराच परिचय झालेला होता. तोच पुढें फलद्रुप झाला. हें निराळें सांगावयास नकोच.

 इ. स. १६२१ त लुखजी जाधवराव मोगलांस जाऊन मिळाला, त्यावेळी निजामशाहीच्या तक्तावर अज्ञान मुलगा असल्यामुळे, तेथील कित्येक स्वार्थी सरदार प्रबळ होऊन आजूबाजूच्या मुलखांत लुटालूट करीत असत. त्याचप्र-