पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाणीव करून देत होते. ह्याप्रमाणे सारख्या तीन पिढ्य | इतक्या मोठ्या वतनाचा उपभोग घेत असल्यामुळे, तशांत मावळांतील प्रदेशहि नेहमींच सुपीक तेणेंकरून हें घराणे त्या काळी चांगलेच धनवान होतें, हे सांगणे नकोच. ह्या सुप्रसिद्ध घराण्यांत चरित्रनायकाचा जन्म शके १५३७ (सन १६१५ ) त झाला.

 बालकाचे पाय पाळण्यांत दिसतात, अशी ह्मण आहे. त्याप्रमाणेंच चरित्रना- यक पुढें प्रसिद्ध पुरुष होणार, असे त्यांचे घराण्यांतील वडील मनुष्यांस त्याच्या लहानपणापासून वाटत असे, ते जसजसे मोठे होऊं लागले, तसतसे त्यांच्या प्रत्येक लीला मोठ्या अवर्णनीय असत. त्यांस त्या काळानुसार शिक्षणाहे मिळाले होतें. प्राधान्येंकरून त्यावेळच्या युद्धकलेचेंहि शिक्षण मिळाले होते. त्यांत तर त्यांनी चांगलेच प्राविण्य मिळविलें. दांडपट्टा खेळणे, घोड्यावर बसून तीरंदाजी व निशाण मारणे, हे त्यांस चांगलेच अवगत झालें होतें. ते शरीराने उंच, बांधा सदृढ असून त्यांचा चेहरा प्रफुल्लीत असा होता. त्यावेळी मावळ प्रांतावर विशे षतः मुसलमानी राजाचा अम्मल असल्यामुळे, त्या भाषेचा बराच प्रसार झालेला होता. चरित्रनायकांस ह्या भाषेचें ज्ञान चांगलेच झाले असल्याकारणानें, ते फकिराचे दोहरे वगैरे बोलू लागल्यास, हे कोणतरी अवलीया ( फकीर ) आहेत असें ऐकणारांस वाटे. तशांत त्यांच्या वाणीत मधुरता असल्यामुळे प्रति- पक्षांवर छाप तेव्हांच बसे.

 बहामनी राज्य मोडून त्याचे पांच भाग झाले. त्यांत मावळाप्रांताचा उत्तरेकडील कांही भाग निजामशाहीच्या वाट्यांस आला होता, व कांही दक्षिणेकडील भाग अदिलशाहीत गेला होता. तत्कालीन महाराष्ट्राची परिस्थिती झटली ह्मणजे,मोगलांची, नेजामशाही