पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६ हिंजण मावळ व ७ किर्यात मावळ व पांच खोरी आहेत तीं १ मोसे खारें २ मुठें खोरें ३ कानद खोरें ४ पौड खोरें व ५ रोहिड खोरें, याप्रमाणे नांवें आहेत.

 चांद्रसेनीय कास्यथ प्रभु जे उत्तर हिंदुस्थानांतून दक्षिणेंत आले, ते प्रथम स- ह्यद्रिपर्वताच्या आश्रयाने राहून आपले संरक्षण करून घेतलें, व नंतर उदरनिर्वाहार्थ योग्य संधी घेऊन जिकडे जशीं ज्यांची सोय झाली तिकडे ते गेले. परंतु तेथें जाण्यापूर्वी बहुतेकांनी आपले वास्तव्य मावळ प्रांतांतच विशेषतः केलें होतें. त्यांत दिघे यांचे वास्तव्य विशेषतः खोऱ्यांत बरेंच होतें व अद्यापहि कित्येक वसाहती आहेत. त्यांनी तेथें वसाहत केल्यानंतर स्वपराक्रमानें, कुळकर्ण, देशकुळकर्ण, देशमुख, देशपांडे वगैरे वतनें बहामनी राजांपासून संपादन केली. पुढे निजामशाहि, अदिलशाहि, कुतूबशाहि (गोवळकोंडे ) वगैरे पादशाहीत या घराण्यांतील बरेच पुरुष आपले पराक्रम गाजवून प्रसिद्धीस आले. हें खालील उताऱ्यावरून स्पष्ट होतें.

 बाहामनी राज्यांत ज्यांस जशी सवड सांपडली, तशी त्यांनी त्या भागांत देशमुखी वतनें संपादन करून मावळ प्रांत वसविला. मावळांतील या देशमुखांस मावळे म्हणतात. * * * त्यांच्या बाण्यावरून ते क्षत्रिय होते. हें निर्विवाद ठरतें. हे लोक चांगले घरंदाज, इभ्रतदार व वतनदार बरेचसे शिकलेले, व्यवहारचतुर व चांगले द्रव्यवान असे होते. ते आपल्या टापूपुरते स्वतंत्र कारभार करीत. त्यांच्या मदतीस बहुधा प्रभु देशपांडे व कुळकर्णी असत, ते कधीं कोणांस हार जात नसत. त्यांचें वीर्यतेज मोठें प्रखर होतें. ह्यावेळी डोंगरी किल्ले मराठे लोकांकडे बादशहाकडून असत. कधी कधीं देशमुख देशपांडे यांकडे असत. त्यांच्या संरक्षणार्थ, त्यांस फौज ठेविण्याकरितां व फौजसहित आपल्या चाकरीत असावें म्हणून त्यांस जहागिरी,