पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याचप्रमाणे त्यांनी यज्ञहि केला होता. या घराण्याची मुख्य देवता - जननी देवी, खंडेराव (जेजूरीचा ) व एकवीरा, हीं आहेत. श्रीजननीदेवीचे मुख्य ठिकाण कुलाबा जिल्ह्यांत रोहें तालुक्यांत जननी नांवाचा डोंगर आहे, त्या डोंगरांत आहे. सदरहू देवीच्या देवळाचा जीर्णोद्धार इ. स. १८२८ त कै. श्री. विठ्ठलराव देवाजी दिवे यांनी केला होता.

 वरील ग्रामण्याच्या यादीतील शेवटचें नांव जे गोपाळप्रभु आहे त्याच्या- पासून बारावा पुरुष गोपाळ भु हा पाली ऊर्फ अमिनाबाद येथील देशमुख होता. ह्या ठिकाणी वतनावरून आपसांत कलह होऊन मारा- मान्या झाल्या. त्यांत गोपाळप्रभु इ. स. १५६४ त मारिला गेला. त्यास दोन पुत्र होते तेः- १ मीठप्रभु व २ जोगदप्रभु हे उभयतां वरील दंग्याच्या भीतिस्तव तेथून पळून गेले. ते अनुक्रमें मीडप्रभु मोसे- खोरें येथें व जोगदप्रभु हे उंबरडी तर्फ निजापूर येथे येऊन राहिले. त्या प्रांतास मावळ असें ह्मणतात. मावळ ही संज्ञा पडण्याचें कारण असे कीं, बहामनी राज्याच्या मावळत्या दिशेचा ह्मणजे पश्चिमेकडील हा प्रांत असल्या- मुळे, त्या भागांस मावळता प्रदेश हें नांव पडलें, व पुढे त्यांस मावळ हेंच नांव प्रचारांत आलें. ह्या मावळ प्रांताचे निरनिराळ्या डोंगराच्या रांगांनी त्या प्रांताचे एकंदर बारा भाग झालेले आहेत. त्यांपैकी सात भागांस आवळ असे ह्यगतात, व पांच भागास खोरें असें ह्मणतात. त्यापैकी मावळाचे सात भाग आहेत तेः-

१ नाणे मावळ २ हिरडस मावळ ३ पवन मावळ ४ अंदर मावळ ५ गुंजाण मावळ


 * ह्या यज्ञाची हकीगत आह्मीं प्रसिद्ध केलेले, ऐतिहासिक - जुने- लेख पु. ३ रें ग्रामण्याची संक्षिप्त माहिती व आज्ञापत्रे यांत सविस्तर दिली आहे, ती वाच- कांनी अवश्य वाचावी.