पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यावेळी जे प्रभुलोक दिघा येथे रहात होते, त्यांस ह्या शहाराचें नांवावरून नांव पडले असावें. पुढे दिघा याचें रूपांतर दिवे असे झाले असावें असें वाटतें. गांवावरून आडनावें प्रचारांत आलेली पुष्कळ उदाहरणे आहेत.

 ग्रामण्यासंबंधी जुनी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यांत २१ पुरुषांची नांवें दिली आहेत, तीं: - १ मुकुंदप्रभु २ सिद्धप्रभु ३ गोपाळप्रभु ४ देवाजीप्रभु ५ धीरजप्रभु ६ वीरजप्रभु ७ नारायणप्रभु ८ हरजीप्रभु ९ बाळाजीप्रभु १० मणि शंकरप्रभु ११ विसाजीप्रभु १२ प्रेमजीप्रभु १३ हरिहरप्रभु १४ विश्वनाथप्रभु १५ प्रभाकरप्रभु १६ गोविंदप्रभु १७ शिवाजीप्रभु १८ माधवप्रभु १९ गोपाळप्रभु २० जिवाजीप्रभु २१ गोपाळप्रभु-याप्रमाणे ह्या दिघे घराण्यांतील पुरुषांची नांवें दिलेली आहेत. ह्या दिघे घरण्यांतील १९ साव्या पुरुषाने मांडवगड येथें अग्निहोत्राची दिक्षा घेतली. त्यावरून गोपाळप्रभुच्या वंशजांस पुढे दिक्षित हैं उपनांव पडलें गेलें. तेव्हांपासून ह्या घराण्याच्या दोन शाखा झाल्या. त्यांत एकास दिधे व दुसन्यास दिक्षित या नावें संबोधूं लागले.

 ह्या दोन्ही घराण्याचें गोत्र कृपाचार्य प्रवरें अनुक्रमें आंगिरस, गौतम व शारद्वत ( औत्सर) अशी तीन आहेत. अश्वलायन शाखा व कात्यायनी सूत्र ह्याप्रमाणें धर्माधिकार परत्वें माहिती मिळते. तसेंच ह्या घरण्यांतील दोन्ही शाखांची आडनांवें- दिघे, दिक्षित, देशपांडे, कुळकर्णी, देशमुख, टिपणीस, कोत- निस, दप्तरदार, सिंधकर, चौककर, वगैरे हल्ली प्रचारांत आहेत. ह्याच घराण्यांतील वंशज प्रख्यात विठ्ठलराव देवाजी उर्फ काठेवाड दिवाणजी हे गायकवाडीत स्वपराक्रमानें प्रसिद्धीस येऊन बडोंदें येथें त्यानीं अग्निहोत्र यशस्वी केले.
-